6 layered Healthy Stuffed Veg -heese Paratha For Kids Nashta-Tiffin Recipe In Marathi
चपाती-भाजी खायचा कंटाळा आला बनवा 6 पदरी स्टफ व्हेज-चीज पराठा सगळे आवडीने खातील
आपल्याला काही वेळेस चपाती भाजी बनवायचा किंवा खायचा कंटाळा येतो. मग काय बनवायचे हा प्रश्न पडतो. तर आज आपण 6 पदरी म्हणजेच 6 लेयर स्तफ व्हेज चीज पराठा कसा बनवणार आहोत ते पाहू या.
The 6 layered Healthy Stuffed Veg -heese Paratha For Kids Nashta-Tiffin Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel 6 layered Healthy Stuffed Veg -Cheese Paratha
6 लेयर पराठा बनवताना आपण फ्लॉवर किंवा कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा, कोथिंबीर वापरणार आहोत तसेच गव्हाचे पीठ वापरुन मुलांचे आवडतीचे चीज वापरणार आहोत त्यामुळे आपला पराठा छान हेल्दी व पोटभरीचा बनणार आहे. आपण अश्या प्रकारचा पराठा नाश्ता किंवा जेवणात घेवू शकतो किंवा मुलांना डब्यात सुद्धा देवू शकतो.
साहित्य:
आवरणासाठी:
1 1/2 गव्हाचे पीठ
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
सारणासाठी:
1 मध्यम आकाराचा कांदा
1 मध्यम शिमला मिरची
1 मध्यम आकाराचे गाजर
1/2 कप कोबी किंवा फ्लॉवर
1/4 कप कोथिंबीर
2 हिरव्या मिरच्या
1” आले
मीठ चवीने
चीज क्युब
तेल पराठा भाजण्यासाठी
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ व मीठ घालून मिक्स करून पाणी वापरुन पीठ मळून घ्या, मग त्याला तेल लाऊन पीठ झाकून बाजूला ठेवा.
सारणासाठी: कांदा बारीक चिरून घ्या, शिमला मिरची बारीक चिरून घ्या, गाजर धुवून सोलून किसून घ्या, कोबी किंवा फ्लॉवर बारीक चिरून घ्या, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या, हिरव्या मिरच्या चिरून घ्या, आले किसून घ्या. चीज किसून बाजूला ठेवा.
एका बाउलमध्ये कांदा, शिमला मिरची, गाजर, कोबी किंवा फ्लॉवर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आल व मीठ घालून मिक्स करून घ्या.
6 लेयर पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचे एक सारखे गोळे बनवून घ्या, मग एक गोला घेऊन पीठ लावून त्याचा लांबट आयताकृती लाटून घ्या, असे एक सारखे दोन लाटून घ्या. मग एक आयताकृती पट्टी घेऊन त्यावर त्यावर थोडे सारण पसरवून त्यावर थोडे किसलेले चीज घालून त्यावर दुसरी आडवी पट्टी ठेवून त्यावर थोडे सारण घालून त्यावर चीज घालून पट्टीची एक बाजू फोल्ड करून मग दुसरी पट्टी फोल्ड करून तिसरी पट्टी फोल्ड करून चौथी पट्टी फोल्ड करा म्हणजे त्याचा चौकोनी आकार होईल. मग हलक्या हातानी दाबून घ्या.
तवा गरम झाला की त्यावर थोडेसे तेल घालून त्यावर पराठा छान खरपूस भाजून घ्या.