Crispy Healthy Cabbage Cutlet | Quick Cabbage Nashta Recipe In Marathi
कुरकुरीत टेस्टी कोबीचे कटलेट | झटपट कोबी चा नाश्ता मुलांना नक्की आवडेल डब्बा लगेच संपेल
कोबी आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. आपण कोबीची भाजी बनवतो, किंवा कोबीची भजी बनवतो पण आपण कोबीचे कटलेट बनवले आहेत का? बनवून पहा मस्त कुरकुरीत होतात तसेच त्यामध्ये आपण गाजर, शिमला मिरची किंवा अजून काही भाज्या वापरू शकतो त्यामुळे हा नाश्ता हेल्दी बनतो.
The Crispy Healthy Cabbage Cutlet | Quick Cabbage Nashta Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Crispy Healthy Cabbage Cutlet | Quick Cabbage Nashta
कोबीचे कटलेट बनवताना आपण त्यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा आजिबात वापरणार नाही. आपण रवा व तांदळाचे पीठ वापरणार आहोत रवा व तांदळाचे पीठ सुद्धा उपयोगी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 10 कटलेट बनतात
साहित्य:
1 कप कोबी (उभा पातळ चिरून)
2 टे स्पून तांदळाचे पीठ
1/2 वाटी बारीक रवा
2 टे स्पून कांदा (चिरून)
2 टे स्पून गाजर (किसून)
2 टे स्पून शिमला मिरची (बारीक चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टी स्पून चाट मसाला
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
तेल कटलेट फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम कोबी उभा पातळ चिरून धुवून घ्या, कांदा बारीक चिरून घ्या, गाजर किसून घ्या, शिमला मिरची बारीक चिरून घ्या, कोथिंबीर चिरून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या.
एका बाउल मध्ये चिरलेला कोबी, कांदा, गाजर, शिमला मिरची व हिरवी मिरची घ्या, मग त्यामध्ये तांदळाचे पीठ, रवा व मीठ चवीने घालून मिक्स करून 15 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चिलीफ्लेस्क, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. रवा कोबीमध्ये भिजल्यामुळे त्याला पाणी सुटेल व मिश्रण ओले होईल. मग त्याच्या छोट्या छोट्या टिकी बनवून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा व त्यावर थोडेसे तेल लाऊन त्यावर टिकी मांडून घ्या, मग बाजूनी थोडेसे तेल सोडा व छान कुरकुरीत भाजून घ्या. मग उलट करून परत बाजूनी थोडेसे तेल सोडून छान कुरकुरीत भाजून घ्या.
आता गरम गरम कोबीचे कटलेट टोमॅटो सॉस बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.