Healthy Mod Alelya Mugacha Paratha For Kids Nasta-Tiffin Recipe In Marathi
हेल्दी मोड आलेल्या मुगाचा पराठा मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी आवडीने खातील
मूग हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. मोड आलेले मुग हे पचायला हलके असून आरोग्यदायी आहेत. मोड आलेल्या मुगा पासून आपण बरेच प्रकारचे पदार्थ बनवू शकतो.
आज आपण मोड आलेल्या मुगा पासून मस्त टेस्टि खमंग पराठे बनवणार आहोत. पराठे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच टेस्टि पण लागतात.
The Healthy Mod Alelya Mugacha Paratha For Kids Nasta-Tiffin Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Healthy Mod Alelya Mugacha Paratha For Kids Nasta
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 6 पराठे बनतात
साहित्य:
1 कप मोड आलेले मुग
1 कप बेसन
4-5 लसूण पाकळ्या
1” आले
2-3 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
2-3 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
तेल पराठे भाजण्यासाठी
कृती: प्रथम मुगाला मोड आणून घ्या. मुगाला चांगले मोड आलेकी मग मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मग घेवून त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची घालून 2 टे स्पून पाणी घालून ब्लेंड करून घ्या, थोडेसे जाडसरच वाटायचे बारीक वाटायचे नाही.
एका बाउलमध्ये वाटलेले मुगाचे मिश्रण घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, हळद, हिंग, कोथिंबीर व मीठ घालून थोडेसे पाणी वापरुन पीठ मळून घ्या, मग त्यामध्ये एक टे स्पून तेल घालून परत चांगले मळून घ्या. मग मळलेल्या पिठाचे एक सारखे 4 गोळे बनवून घ्या.
तवा गरम करायला ठेवा. मग एक गोळा घेऊन त्याला पीठ लाऊन पातळ लाटून घ्या. मग लटलेला पराठा गरम तव्यावर घालून तेलावर छान खरपूस भाजून घ्या. अश्या प्रकारे बाकीचे पण पराठे लाटून भाजून घ्या.
गरम गरम मोड आलेल्या मुगाचे पराठे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.