पौष्टिक टेस्टि कुरकुरीत पालक कटलेटस् मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी मिनिटात संपेल
Healthy Tasty Crispy Palak Cutlets | Spinach Cutlets For Kids Tiffin Recipe In Marathi
मुलांना रोज रोज डब्यात काय द्यायचे किंवा नाश्तासाठी काय बनवायचे ते सुद्धा पौष्टिक, आज आपण ताजा पालक वापरुन पालकचे कटलेट्स बनवणार आहोत.
पालकचे कटलेट्स बनयायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच
पालक पौष्टिक असून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. पालक चे कटलेट बनवताना पालक थोडा वाफवून घेतला आहे मग त्यामध्ये उकडलेले बटाटे घातले आहेत आपण पाहिजे तर त्यामध्ये गाजर शिमला मिरची सुद्धा घालून शकता.
The Healthy Tasty Crispy Palak Cutlets | Spinach Cutlets For Kids Tiffin Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Healthy Tasty Crispy Palak Cutlets | Spinach Cutlets
पालकचे कटलेट्स दिसायला आकर्षक दिसतात. आपण नाश्तासाठी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर एक मस्त डिश म्हणून सुद्धा बनवू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 9 कटलेट्स
साहित्य:
थोडी पालकची ताजी पाने
4 मध्यम आकाराचे बटाटे
1/2 कप ब्रेड क्रम
3 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
3 लसूण पाकळ्या
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून जिरे पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
1 कप ब्रेड क्रम आवरणासाठी
तेल पालक कटलेट शालो फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम पालक निवडून धुवून घ्या. ब्रेड स्लाइस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. बटाटे उकडून, सोलून किसून घ्या.
एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये आल,लसूण व हिरवी मिरची 10 सेकंद गरम करून घ्या. मग त्यामध्ये धुतलेला पालक घालून 2- मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या, पाणी आजिबात वापरायचे नाही. मग विस्तव बंद करून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या.
एका बाउलमध्ये पालक पयूरी, किसलेले बटाटे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, मीठ व 1/2 कप ब्रेड क्रम घालून मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या टिकी निरनिराळ्या आकाराच्या बनवून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडेसे तेल घालून सर्व टिकी मांडून घ्या, बाजूनी थोडेसे तेल घालून छान कुरकुरीत भाजून घ्या, मग उलट करून परत बाजूनी थोडेसे तेल घालून दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान कुरकुरीत भाजून घ्या.
गरम गरम पालक कटलेट्स टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.