लाजवाब स्ट्रीट स्टाइल एग फ्राइड राइस मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी संपेल मिनिटात
Streat Style Egg Fried Rice For Kids Tiffin-Nashta Recipe In Marathi
अंडी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. अंड्याचा फ्राइड राईस मुलांना खूप आवडतो किंवा मोठ्यांना सुद्धा आवडतो. अंड्याचा फ्राइड राईस बनवताना अंडी फोडून घातली आहेत तसेच त्यामध्ये गाजर व शिमला मिरची घातली आहे त्यामुळे त्याची टेस्टि मस्त लागते.
The Streat Style Egg Fried Rice For Kids Tiffin-Nashta Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Streat Style Egg Fried Rice For Kids Tiffin-Nashta
अंड्याचा फ्राइड राईस आपण मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो बनवायला सोपा व झटपट होणारा आहे.
साहित्य:
2 कप शिजवलेला भात
2 अंडी
1 मध्यम आकाराचा कांदा
1 मध्यम आकाराचे गाजर
1 मध्यम आकाराची शिमला मिरची
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून मिरे पावडर
2 टे स्पून शेजवान सॉस
मीठ चवीने
3 टे स्पून तेल
2 लवंग
7-8 मिरे
1” दालचीनी
1 तमालपत्र
कृती: प्रथम भात शिजवून घ्या, भात शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ व एक चमचा तेल घाला. कांदा उभा पातळ चिरून घ्या, शिमला मिरची चिरून घ्या, गाजर किसून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची ठेचून घ्या. एका बाउल मध्ये अंडे फोडून फेटून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, दालचीनी, मिरे, तमालपत्र घालून उभा पातळ चिरलेला कांदा घालून थोडा परतून त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घाला थोडे परतून घेवून त्यामध्ये शिमला मिरची, गाजर घालून थोडे परतून घ्या, मग त्यामध्ये मीठ चवीने घालून फेटलेले अंडे घालून मिक्स करून अंडे शिजे पर्यन्त परतून मग शेजवान सॉस घालून मिक्स करून घ्या.
आता शिजवलेला भात घालून मिक्स करून 2-3 मिनिट राईस परतून घ्या किंवा दोन मिनिट झाकण ठेवून एक वाफ येवू द्या मग परत थोडे परतून घ्या.
आता मुलांना गरम गरम अंडा फ्राइड राईस सर्व्ह करा.