Tasty Crispy Masala Vada For Rainy Season Recipe In Marathi
बाहेर मस्त पाऊस पडत आहे चहा बरोबर कुरकुरीत चमचमीत मसाला वडा बनवला सर्वाना आवडला
आता पावसाळा सीझन चालू आहे त्यामुळे गरम गरम भजी किंवा वडे त्या सोबत गरम गरम मसाला चहा अगदी झकास मेनू आहे. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारची भजी कशी बनवायची ते पाहिले आता आपण पाहू या कुरकुरीत मसाला वडा कसा बनवायचा.
The Tasty Crispy Masala Vada For Rainy Season Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Crispy Masala Vada
मसाला वडा साधारणपणे साऊथ ह्या भागात बनवतात. जसे इडली डोसा साऊथ इडियन लोक बनवतात व ते भारत भर प्रसिद्ध सुद्धा आहेत तसेच मसाला वडा सुद्धा भारत भर प्रसिद्ध आहे.
मसाला वडा बनवताना चनाडाळ व तुरडाळ वापरली आहे. खर म्हणजे तुरडाळ वापरल्याने वडे छान कुरकुरीत होतात व अजून मस्त कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ सुद्धा वापरले आहे.
साहित्य:
1 छोटी वाटी चनाडाळ
1 छोटी वाटी तुरीची डाळ
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 छोटा कांदा (चिरून)
1/4 वाटी कोथिंबीर (धुवून चिरून)
10-12 कडीपत्ता पाने (चिरून)
2-3 हिरव्या मिरच्या
1” आले तुकडा
1/4 टी स्पून हिंग
2-3 लाल सुक्या मिरच्या
10-12 मिरे
1 टी स्पून बडीशेप
1 टी स्पून धने
1 टी स्पून जिरे
मीठ चवीने
तेल वडे तळण्यासाठी
कृती: प्रथम चनाडाळ व तुरडाळ धुवून पाण्यात 3-4 तास भिजत ठेवा. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या.
मिक्सरच्या जार मध्ये चनाडाळ व तुरडाळ पाणी काढून घेऊन त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या, धने-जिरे, बडीशेप, आले, हिरव्या मिरच्या व मिरे घेऊन फक्त 2 टे स्पून पाणी घालून थोडे जाडसर वाटून घ्या.
एका बाउलमध्ये वाटलेली डाळ, चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, हिंग व कडीपत्ता घालून मिक्स केले.
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, तेल गरम झाल्यावर छोटे छोटे वडे तेलात घालून छान कुरकुरीत होई पर्यन्त गोल्डन रंगावर तळले.
गरम गरम मसाला वडे चहा बरोबर सर्व्ह केले. सर्व्ह करताना टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह केले, सर्वांना आवडले.