Tasty Healthy Sweet Potato Bread Toast Nashta For Kids Recipe In Marathi
टेस्टि हेल्दी रताळ्याचा नाश्ता बनवला मुलांनी आवडीने पोटभरून खाल्ला व राहिलेला डब्यात नेला
रताळी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. आपण रताळी नेहमी उपवास असलेतर वापरुन त्याचे पदार्थ बनवतो. पण रताळी वापरुन आपण त्याच्या पासून मस्त निराळा नाश्ता सुद्धा बनवू शकतो.
The Tasty Healthy Sweet Potato Bread Toast Nashta For Kids Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Healthy Sweet Potato Bread Toast Nashta
आपण रताळी उकडून, सोलून किसून त्यामध्ये हेल्दी भाज्या वापरुन थोडेसे मसाले वापरुन एक मस्त हेल्दी नाश्ता बनवू शकतो. मुले व मोठी माणसे सुद्धा आवडीने खातील.
साहित्य:
8 ब्रेड स्लाइस
2 मोठ्या आकाराची रताळी
1 छोटा कांदा
1 छोटे गाजर
1 छोटी शिमला मिरची
2 हिरव्या मिरच्या
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टी स्पून लिंबुरस
तेल टोस्ट फ्राय करण्यासाठी
2 टे स्पून तीळ
कृती: रताळी स्वच्छ धुवून उकडून, सोलून किसून घ्या. कांदा, गाजर, शिमला मिरची बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या, हिरव्या मिरच्या चिरून घ्या. ब्रेड स्लाइसच्या कडा थोड्याश्या कापून घ्या व ब्रेड बाजूला ठेवा.
रताळे किसून एका बाउलमध्ये घ्या, मग त्यामध्ये चिरलेले गाजर, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची व कोथिंबीर घाला. त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिलीफ्लेस्क, लिंबुरस व मीठ घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेटमध्ये ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर 1 टे स्पून किंवा 1 1/2 टे स्पून रताळ्याचे मिश्रण लाऊन त्यावर तीळ लावा किंवा एका प्लेट मध्ये तीळ पसरवून त्यावर मिश्रण लावलेली बाजू तिळांवर ठेवून हलकेच दाबून काढून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा त्यावर थोडेसे तेल लाऊन ब्रेड स्लाइस ठेवा. तवा मोठा असले तर 2 तरी ब्रेड स्लाइस बसतील त्यानुसार ठेवा मग बाजूनी थोडेसे तेल सोडून छान भाजून घ्या, मग उलट करून परत थोडेसे तेल सोडून थोडेसे भाजून उलट करून घ्या. आता आपला नाश्ता तयार झाला आहे. अश्या प्रकारे सर्व ब्रेड स्लाइस ला मिश्रण लावून टोस्ट बनवून घ्या.
एका प्लेट मध्ये नाश्ता काढून घेऊन वरतून थोडेसे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉसने सजवून सर्व्ह करा.