चमचमीत झणझणीत गावाकडील पद्धतीचा चिकन रस्सा बनवला सर्वानी आवडीने खाल्ला
Tasty Spicy Village Style Chicken Gravy Recipe In Marathi
आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये चिकन ग्रेव्ही निरनिराळ्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहिले आहे. आज आपण परत नवीन पद्धत बघणार आहोत.
आपल्याला माहिती असेलच खेडेगावात आपल्या शहरामध्ये जसे विविध प्रकारचे चिकन मसाले मिळतात तसे खेडे गावात मिळत नाहीत. त्यांना आपल्या घरात जे साहित्य असेल ते वापरुन बनवावे लागते. घरातील मोजक्याच साहित्या मध्ये ही चिकन ग्रेव्ही बनवली तरी मस्त टेस्टि स्वादिष्ट लागते.
The Tasty Spicy Village Style Chicken Gravy Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Spicy Village Style Chicken Gravy
गावाकडील चिकन ग्रेव्ही बनवताना कांदे व सुके खोबरे भाजून घेतले आहे. व मोजकेच साहित्य वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम बोनलेस चिकन
चिकन मेरिनेट करण्यासाठी मसाला:
1 कप कोथिंबीर
10-12 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
2-3 हिरव्या मिरच्या
1/2 टी स्पून हळद
मीठ चवीने
चिकन ग्रेव्हीसाठी:
4 मध्यम आकाराचे कांदे
2” सुके खोबरे
2-3 लवंग
1” दालचीनी तुकडा
10-12 मिरे
1 तमालपत्र
1 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
7-8 लसूण पाकळ्या ठेचून
कृती: प्रथम चिकन धुवून एका बाउलमध्ये घ्या, मग चिकनला मेरिनेट करायचे आहे. त्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये कोथिंबीर, आले-लसूण, हिरवी मिरची बारीक वाटून चिकनला लावा त्याच बरोबर हळद व मीठ लावून मिक्स करून झाकून 2 तास बाजूला ठेवा.
चिकन रस्सा बनवण्यासाठी कांदा सोलून घ्या, म्हणजे त्याचे वरचे टरकल काढून टाका. विस्तवावर एक जाळीची प्लेट ठेवून त्यावर सोललेला कांदा व खोबरे ठेवा. मध्यम आचेवर छान भाजून घ्या, खूप काळा रंग येई पर्यंत भाजू नका. मग थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घेऊन मिक्सर जार मध्ये घेऊन त्यामद्धे तमालपत्र, मिरे, दालचीनी, लवंग घालून बारीक वाटून घ्या जरूर तसे थोडेसे पाणी घालून वाटले तरी चालेल.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या ठेचून टाका मग त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून मिक्स करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून 3-4 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मग त्यामध्ये धने-जिरे पावडर, गरम मसाला व मीठ घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये मेरिनेट केलेले चिकन घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा, झाकणामध्ये पाणी घालून मंद विस्तवावर 15 मिनिट शिजवून घ्या, मधून मधून झाकण काढून हलवून परत झाकण ठेवा.
आता झकणातील गरम पाणी चिकन मध्ये घाला लागत असेलतर अजून 1/2 वाटी पाणी घालून मिक्स करून 2-3 मिनिट शिजवून घ्या. मग कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
चिकन रस्सा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.