घरातील कलहा पासुन मुक्त होण्यासाठी वास्तुचे सोपे उपाय केल्यास प्रेम व सुख-शांती वाढेल
Vastu Tips: Amazing Vastu Tips For Family Peace In Marathi
घरातील परिवारामद्धे भांडणे कलह होण हे सहाजिकच आहे. पण काही वेळेस गोष्टी अगदी हाताबाहेर जातात. आपल्याला माहिती आहे का वास्तु दोष असल्यामुळे सुद्धा घरात कलह होतात. त्यामुळे घरातील वातावरण अगदी बिघडून जाते व घरात सारखे टेंशनचे वातावरण राहते. घरातील भांडणे नेहमी वेळच्या वेळी थांबून घरातील व्यक्तिमध्ये हितसंबंध राहिले पाहिजेत व आपल्या घरातील व्यक्तिमध्ये दुरावा झाला नाही पाहिजे. तसेच घरातील छोट्या छोट्या गोष्टी वरून होणारे भांडण-तंटे लगेच सोडवले पाहिजेत.
The Vastu Tips: Amazing Vastu Tips For Family Peace In Marathi can be seen on our You tube Chanel Vastu Tips: Amazing Vastu Tips For Family Peace
आज आपण वास्तु साठी असे काही सोपे उपाय पाहणार आहोत त्यामुळे घरातील क्लेश दूर होण्यास मदत होईल.
गृह क्लेश पासून छुटकारा मिळण्यासाठी अचूक उपाय:
ज्योतिष शास्त्रा नुसार गृह क्लेश पासून छुटकारा मिळण्यासाठी पांढऱ्या चंदनाची लाकडी मूर्ती घरात ठेवा. त्यामुळे घरातील व्यक्तिमध्ये तणाव कमी होईल व नाते संबंध सुधारेल. जर आपल्याला घरात पांढरी चंदनाची मूर्ती ठेवणे शक्य नसेलतर कदंबच्या झाडाची एक फांदी घरात लावावी. त्यामुळे घरात सुख शांती राहील.
वास्तुच्या ह्या उपायांनी पैशांनी घर भरून जाईल:
गृह क्लेश पासुन छुटकारा मिळण्यासाठी मिठाचा उपाय खूप फायदेमंद आहे. वास्तु शास्त्रा नुसार मीठ हे घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करणारा उपाय मानला जातो. आपण आपल्या घरातील एका कोपऱ्यात एक मिठाचा खडा एक महिन्या पर्यन्त तसाच ठेवा. मग एक महिना झालकी तो मिठाचा खडा उचलून दूसरा मिठाचा खडा ठेवा.
घरातील क्लेश दूर करण्यासाठी मंगळवार ह्या दिवशी हनुमान जीनच्या मंदिरामध्ये पंचमुखी दिवा लावावा. मग आपल्या घरात अष्टगंध जाळून त्याची धुरी घरात फिरवा. असे केल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे घरात सुख शांती येते.
कापुरचा उपाय केलातर घरामधील कलह भांडणे दूर होण्यास मदत होते. त्यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर गाईच्या तुपामध्ये कापुर भिजवून मग पितळी भांड्यात जाळावा असे केल्याने घरांमध्ये शांती टिकून राहून कलह होत नाहीत. आपण आठोडयात एकदा तरी घरात कापुर जाळून संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवावा. त्यामुळे घरात शांती राहते.
केशर चा उपाय सुद्धा आपण आपल्या घरातील कलह दूर करण्यासाठी करू शकता. त्यासाठी आपण एक चिमुट केशर अंघोळीच्या पाण्यात घालून त्यांनी आंघोळ करू शकता. मग घरातील देवघरात पूजा अर्चा करू शकता मग केशरचा टिळा लावावा किंवा केशरचे दूध सेवन केल्याने सुद्धा घरात शांती व समन्वय राहतो.
घराची सजावट करताना काळा रंग वापरू नये. घराच्या सजावटीसाठी काळा रंग अशुभ आहे, नेहमी सोम्य रंग वापरा.
घरातील दारे खिडक्यांचे पडदे नेहमी स्वच्छ ठेवा तसेच ते फाटलेले नसावे नाहीतर घरात नाकारात्मकता येते.
घरातील सोफा व टीव्ही नेहमी पश्चिम दिशेला ठेवा. तसेच घरातील सजावटीच्या फ्रेम नेहमी सोम्य असाव्या, हिंसक प्राण्यांच्या असू नयेत. घरात फिशटॅंक ठेवणे शुभ असते.