Zatpat In 10 Miniutes Tasty Cauliflower Bhaji For Kids Tiffin Recipe In Marathi
उठायला उशीर झाला, 10 मिनिटात सोपी टेस्टि कॉलिफ्लॉवर भाजी मुलांच्या आवडतीची
आपल्याला कधी कधी उठायला उशीर होऊ शकतो. मग मुलाच्या डब्यासाठी झटपट कोणती भाजी बनवायची हा प्रश्न पडतो. तसेच भाजी जर मुलाची आवडतीची असेलतर डब्बा संपूर्ण संपतो.
The Zatpat In 10 Miniutes Tasty Cauliflower Bhaji For Kids Tiffin Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Zatpat In 10 Miniutes Tasty Cauliflower Bhaji
आज आपण अशीच एक सोपी झटपट होणारी कमी मसालेदार कॉलिफ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते पाहू या. अश्या प्रकारची कॉलिफ्लॉवरची भाजी झटपट होणारी आहे तसेच मस्त टेस्टि लागते.
साहित्य:
250 ग्राम कॉलिफ्लॉवर
1 मध्यम आकाराचा कांदा
3 हिरव्या मिरच्या
6-7 कडीपत्ता पाने
1/2” आले )किसून)
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
कोथिंबीर चिरून
फोडणी करिता:
1 1/2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
कृती: प्रथम कॉलिफ्लॉवरचे तुरे कापून पाण्यात घालून ठेवा. मग बारीक चिरून घ्या. परत स्वच्छ पाण्यांनी धुवून घ्या. कांदा चिरून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी. जिरे, हिंग, कांदा कडीपत्ता घालून मग हिरवी मिरची घालून 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद व मीठ घालून मिक्स करून चिरेलेला कॉलिफ्लॉवर घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा, झाकणावर पाणी घालून 5 मिनिट भाजी मंद विस्तवावर वाफवून घ्या., मधून मधून झाकण काढून भाजी हलवून झाकण परत ठेवा.
कॉलिफ्लॉवर भाजी शिजल्यावर त्यामध्ये कोथिंबीर व लिंबुरस घालून मिक्स करून एक मिनिट भाजी गरम करून विस्तव बंद करा.
गरम गरम कॉलिफ्लॉवर भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.