Healthy Crispy Moong Dal Puri For Kids Tiffin Recipe in Marathi
हेल्दी कुरकुरीत टेस्टि मुगाच्या डाळीच्या पुऱ्या मुलांच्या डब्यासाठी
मुगाची डाळ आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. मुगाच्या डाळीच्या पुऱ्या मस्त टेस्टि हेल्दी व कुरकुरीत लागतात. मुलांना नाश्ता साठी किंवा डब्यात द्यायला छान आहेत.
मुगाच्या डाळीच्या पुऱ्या बनवताना प्रथम डाळ भिजवून घेऊन मग त्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत. तसेच आपण पुरीसाठी गव्हाचे पीठ व रवा वापरणार आहोत हे दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. कसूरी मेथी व कोथिंबीर मुळे छान चव येते.
The Healthy Crispy Moong Dal Puri For Kids Tiffin Recipe in Marathi can be seen on our You tube Chanel Healthy Crispy Moong Dal Puri
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1 कप मुगाची डाळ
1 1/4 गव्हाचे पीठ
2 टे स्पून बारीक रवा
1 टी स्पून बडीशेप
7-8 मिरे
2 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून जिरे
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
1 टी स्पून कसूरी मेथी
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
तेल पुरी तळण्यासाठी
कृती: प्रथम मुगाची डाळ धुवून 3-4 तास पाण्यात भिजत ठेवा. मग मिक्सरजार मध्ये मुगाची डाळ, मिरे, बडीशेप, जिरे व हिरव्या मिरच्या घालून बारीक वाटून घ्या. मुगाची डाळ वाटताना फक्त 1-2 टे स्पून पाणी घालून वाटू शकता. मग मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या, मग त्यामध्ये बारीक रवा घालून मिक्स करून 10 मिनिट झाकून ठेवा म्हणजे रवा चांगला भीजेल.
आता 10 मिनिट झाल्यावर मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, हिंग, कसूरी मेथी, कोथिंबीर, मीठ चवीने घालून घट्ट पीठ मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. एक गोळा घेऊन पुरीच्या आकाराचा लाटून घ्या, बाकीच्या पुऱ्या सुद्धा लाटून घ्या.
कढई मधील तेल गरम झाले की पुऱ्या छान कुरकुरीत तळून घ्या. पुऱ्या तळून झाल्या की टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.