In 10 Minutes Soft Delicious Coconut Barfi Recipe In Marathi
10 मिनिटात मऊ तोंडात टाकताच विरघळणारी पांढरी शुभ्र नारळाची बर्फी नारळी पूर्णिमा रक्षाबंधन स्पेशल
नारळी पूर्णिमा किंवा राखी पूर्णिमा ह्या दिवशी नारळाचे पदार्थ आवर्जून बनवले जातात. ह्या अगोदर आपण नारळी भात कसा बनवायचा, नारळी खीर, नारळाची पुरणपोळी किंवा नारळाचे कोफ्ते कसे बनवायचे ते पाहिले.
The In 10 Minutes Soft Delicious Coconut Barfi Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Soft Delicious Coconut Barfi
आज आपण नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहू या. नारळाची बर्फी बनवताना आपण डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. त्यामुळे बर्फी छान मऊ झाली व तोंडात टाकताच वीरघलेल अशी बनते.
अश्या प्रकारची नारळाची बर्फी बनवायला सोपी आहे व झटपट होणारी आहे.
साहित्य:
2 कप दूध
1 कप डेसिकेटेड कोकनट
1/2 कप साखर
1 टी स्पून वेलची पावडर
4-5 बदाम
कृती: एका कढईमध्ये दूध गरम करायला ठेवा, दूध चांगले गरम झालेकी त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करून घ्या. मग मंद विस्तवावर मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या.
आता मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये साखर घालून मिक्स करून परत मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लाऊन घ्या, मग त्यामध्ये मिश्रण काढून एक सारखे करून त्यावर काजू बदाम, पिस्ते घालून मग लाल गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवून हातानी एकसारखे हळुवार पणे दाबून घ्या.
मग एक तास बाजूला झाकून सेट करायला ठेवा. मग त्याच्या छान वड्या कापून घ्या.