Sweet Delicious Caramel Kheer For Festival Recipe In Marathi
स्वादिष्ट कॅरामल तांदळाची खीर नवीन रेसिपी
आपण ह्या अगोदर तांदूळ व नारळ ह्याची खीर कशी बनवायची ते पाहिले. आता आपण तांदळाची कॅरामल खीर कशी बनवायची ते पाहू या.
कॅरामल खीर बनवताना साखर कॅरामल करून घ्यायची. मग खीर बनवून झाल्यावर त्यामध्ये कॅरामल साखर मिक्स करायची. त्यामुळे खीर अगदी टेस्टि लागते व रंग पण सुंदर येतो.
The Sweet Delicious Caramel Kheer For Festival Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Sweet Delicious Caramel Kheer For Festival
कॅरामल खीर आपण सणवाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो बनवायला अगदी सोपी या झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
१/२ लीटर दूध
१/४ कप तांदूळ
१/४ कप साखर
२ टे स्पून तूप
१ टी स्पून तूप
१/४ कप काजू-बदाम-किसमिस
कृती: प्रथम तांदूळ धुवून अर्धातास बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दूध गरम झालेकी त्यामध्ये तांदूळ घालून मिक्स करून मंद विस्तवावर 8 – 9 मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये साखर व वेलची पावडर घालून मिक्स करा.
एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊन बाजूला ठेवा. मग त्याच भांड्यात साखर घालून साखर विरघळवून घ्या. विस्तव मंद ठेवा. साखरेचा हळू हळू रंग बदलू लागेल साखरेचा रंग थोडा डार्क ब्राऊन झालाकी त्यामध्ये 1-2 टे स्पून पाणी घालून लगेच झाकण ठेवा म्हणजे मिश्रण उडणार नाही. आता साखर परत पाण्यामध्ये मिक्स करून घ्या व एक उकळी आणून मग मिश्रण खीरीमध्ये घालून मिक्स करून घ्या.
आता तळलेले निम्मे ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. मग बाउलमध्ये काढून वरतून परत ड्रायफ्रूटने सजवून मस्त पैकी सर्व्ह करा.