स्वादिष्ट आरोग्यदायी करटोली किंवा काटवलची रान भाजी
Tasty Healthy Kartoli | Katwal | Kantoli Chi Ranbhaji Recipe In Marathi
करटोली ही एक रान भाजी आहे. करटोली मध्ये जी प्रथिन असतात तीच प्रथिन मांसाहारात सुद्धा असतात. त्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढवणारे अॅंटीऑक्सिडंटस् आहेत. कारटोली हे डोके दुखीवर अत्यंत गुणकारी औषध आहे.
The Tasty Healthy Kartoli | Katwal | Kantoli Chi Ranbhaji Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Healthy Kartoli | Katwal | Kantoli Chi Ranbhaji
करटोलीची भाजी मधुमेह असणाऱ्याना फायदेमंद आहे त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. ह्याची भाजी रुचकर लागते. त्याच्या सेवणाने पॉट साफ होते. सर्दी खोकला ताप ह्या विकारांवर ही भाजी हितावह आहे. तसेच त्वचारोग होऊ नये म्हणून ही भाजी सेवन करतात.
करटोली ची भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
साहित्य:
250 ग्राम करटोली
3 टे स्पून ओले खोबरे (खोवून)
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ व साखर चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1 छोटा कांदा (चिरून)
2 हिरव्या मिरच्या
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
कृती: करटोली स्वच्छ धुवून पुसून घ्या, मग त्याचे चार भाग करून त्याच्या आतील बिया व गर काढून टाका. मग त्याचे छोटे छोटे काप करून घ्या. कांदा व हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून हळद, म\लाल मिरची पावडर घालून चिरलेल्या करटोल्या घालून मिक्स करून मीठ घालून मिक्स करून कढई वर झाकण ठेवा. झाकणावर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर 7-8 मिनिट भाजी शिजवून घ्या.
आता झाकण काढून भाजी हलवून साखर, ओले खोबरे घालून मिक्स करून एक वाफ येऊ ध्या.
गरम गरम करटोली ची भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.