Tasty Spicy Aloo- Matar Rassa Bhaji Bina Kanda-Lasun Bhandara Style Recipe In Marathi
टेस्टि चमचमीत आलू-मटार रस्सा भाजी बिना कांदा-लसूण भंडारा स्टाईल
आपण सण आसला किंवा देवाला नेवेद्य दाखवायचा असला तर बिना कांदा-लसूण चा स्वयंपाक बनवतो. काही दिवसांपूर्वी मी एक विडियो सुद्धा पब्लिश केला होता. त्यामध्ये कांदा लसूण नवापरता संपूर्ण थाळी कशी बनवायची.
The Tasty Spicy Aloo- Matar Rassa Bhaji Bina Kanda-Lasun Bhandara Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Spicy Aloo- Matar Rassa Bhaji Bina Kanda-Lasun Bhandara Style
आज आपण बिना कांदा लसूण मटार बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहू या. अश्या प्रकारचा मटार बटाटा रस्सा जेथे भंडार असतो तेथे बनवतात. अश्या प्रकारचा मटार बटाटा रस्सा खूप छान टेस्टि लागतो. तसेच बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे.
साहित्य:
3 मध्यम आकाराचे बटाटे
2 टे स्पून मटार
3 मध्यम आकाराचे टोमॅटो
1 टी स्पून आले (किरून)
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून आमचूर पावडर
1 टी स्पून कसूरी मेथी
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 1/2 टी स्पून तेल
2 लवंग
1” दालचीनी तुकडा
7-8 मिरे
1 तमालपत्र
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
कृती: प्रथम बटाटे उकडून सोलून घ्या, आले किसून घ्या. टोमॅटो मिक्सरमध्ये ब्लेंड करून बाजूला ठेवा.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, लवंग, मिरे, दालचीनी, तमालपत्र व जिरे घालून मग त्यामध्ये टोमॅटो पयूरी घालून 2-3 मिनिट परतून त्यामध्ये किसलेले आले घालून मिक्स करून परत 5 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
आता त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, हळद घालून 2 मिनिट परतून चवीने मीठ घालून उकडलेले बटाटे चिरून घ्या. मिक्स करून घ्या व 1 कप किंवा लागेल तसे कोमट पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 7-8 मिनिट शिजवून घ्या. मग झाकण काढून त्यामध्ये कसूरी मेथी घालून मिक्स करून 1 मिनिट उकळी येवू द्या.
गरम गरम मटार-बटाटा रस्सा भाजी पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.