Tasty Spicy Coconut Kofta Curry For Raksha Bandhan Narali Purnima Recipe In Marathi
टेस्टि स्पायसी ओल्या नारळाची कोफ्ता करी नारळी पौर्णिमा स्पेशल अगदी नवीन रेसिपी
आपण ह्या अगोदर दुधी भोपळाची कोफ्ता करी कशी बनवायची ते पाहिले. आता आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे नारळाची कोफ्ता करी. अगदी नवीन रेसिपी आहे बनवून बघा.
The Tasty Spicy Coconut Kofta Curry For Raksha Bhndhan Narali Purnima Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Coconut Kofta Curry For Raksha Bhndhan Narali Purnima
नारळाची कोफ्ता करी बनवताना कोफ्ते बनवताना त्यामध्ये ओला नारळ वापरला आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप निराळी लागते. तसेच करी बनवताना सुद्धा निराळी पद्धत वापरली आहे. अश्या प्रकारची करी आपण बहुतेक करून बनवली नसेल.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
कोफ्ता करिता:
1 वाटी ओला नारळ खोवलेला
3 मध्यम आकाराचे बटाटे
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 ब्रेड स्लाइस (ब्रेड क्रम)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
2 ब्रेड स्लाइस (ब्रेड क्रम)
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कोफ्ता करी करिता:
2 मोठ्या आकाराचे कांदे
1 मोठ्या आकाराचा टोमॅटो
7-8 लसूण पाकळ्या
1” आले
2 हिरव्या मिरच्या
7-8 काजू
1 टी स्पून मगज बी
1 टे स्पून तेल
1“ दालचीनी
2-3 लवंग
7-8 मिरे
1 तमालपत्र
2 टे स्पून तेल
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
1 टी स्पून कसूरी मेथी
कृती: कोफ्ता करी करिता: एका कांद्याचे 4 भाग करून घ्या, टोमॅटोचे 4 भाग करून घ्या, लसूण सोलून घ्या. एका कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये लवंग, दालचीनी, मिरे, तमालपत्र घालून कांदे, आले,लसूण, हिरवी मिरची घालून 2-3 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये टोमॅटो घालून 2 मिनिट परतून घेवून 1 कप पाणी घालून झाकण ठेवून 5-7 मिनिट शिजवून घ्या, मग विस्तव बंद करून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या.
कढईमध्ये 2 टे स्पून तेल गरम करून त्यामधील 1 टे स्पून तेल वाटीत काढून त्यामध्ये 1 टी स्पून लाल मिरची पावडर मिक्स करून बाजूला ठेवा.
मग कढई मधील बाकीच्या तेलात हिंग व वाटलेला मिश्रण घालून मंद विस्तवावर 5 मिनिट परतून घेवून त्यामध्ये हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला व मीठ घालून लागेल तसे पाणी घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर मसाला शिजवून घ्या. मग कोथिंबीर व कसूरी मेथी घालून मिक्स करून घ्या.
कोफ्ता करिता: नारळ खोवून घ्या. बटाटे उकडून सोलून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. ब्रेड स्लाइस मिक्सर मध्ये ब्लेंड करून घ्या. एका बाउलमध्ये खोलेला नारळ, किसलेले बटाटे, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, 2 ब्रेड स्लाइस (ब्रेड क्रम) व मीठ घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम नारळाची कोफ्ता करी सर्व्ह करताना एका बाउल मध्ये 2-3 कोफ्ता ठेवून त्यावर करी घाऊन थोडेशी कोथिंबीर सजवून पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.