Tripur Sundari Sweet Recipe By Royal Chef Sujata
त्रिपुर सुंदरी एक पारंपारिक विस्मरणात गेलेला श्रीमंती पदार्थ तोंडात टाकताच विरघळणारा
त्रिपुर सुंदरी ही एक महाविद्याची देवी आहे. त्रिपुर सुंदरी माता अतिशय सुंदर देखणी देवी आहे.
आज आपण त्रिपुर सुंदरी हा एक पारंपारिक विस्मरणात गेलेल्या श्रीमंती पदार्थ आहे. त्रिपुर सुंदरी पदार्थ बनवताना चनाडाळ, खवा, काजू-बदाम व साखर वापरली आहे.
The Tripur Sundari Sweet Recipe By Royal Chef Sujata in Marathi can be seen on our You tube Chanel Tripur Sundari Sweet Recipe
त्रिपुर सुंदरी हा स्वादिष्ट पदार्थ आपण सणावाराला किंवा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ९ त्रिपुर सुंदरी
साहित्य:
सारणा करिता:
१ कप चनाडाळ
३/४ कप साखर
१/४ कप खवा
१/४ कप काजू-बदाम
१ टी स्पून वेलची पावडर
एक चिमुट मीठ
आवरणाकरिता:
१ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून मैदा
१/४ टी स्पून हळद
२ टे स्पून तेल
मीठ चवीने
कृती: प्रथम चनाडाळ धुवून ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा. काजू-बदाम पण पाण्यात भिजत ठेवा. मग कुकरमध्ये चनाडाळ घेऊन त्यामध्ये ४ कप पाणी घालून त्यामध्ये हळद व मीठ घालून एक चमचा तेल घाला म्हणजे कुकरचे झाकण लावून शिट्टी झाल्यावर पाणी बाहेर येणार नाही. आता कुकरला ५ शिट्या काढून घ्या. मग झाकण काढल्यावर डाळ व पाणी चाळणीवर काढून घ्या. म्हणजे जास्तीचे पाणी भाड्यात काढून त्याची नंतर आमटी बनवला येईल.
एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, हळद व मीठ मिक्स करून पाणी वापरुन पीठ मळून घेऊन त्याला तेल लाऊन परत पीठ चांगले मळून झाकून बाजूला ठेवा.
आता बदामाची साल काढून त्याचे व काजुचे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये घेऊन एक टे स्पून दूध घालून त्याची पेस्ट करून बाजूला काढून ठेवा. खवा किसून बाजूला ठेवा. मग डाळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका पॅनमध्ये वाटलेली डाळ घेऊन त्यामध्ये साखर घालून मिक्स करून मिश्रण मंद विस्तवावर आटवायला ठेवा. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये बदाम पेस्ट, खवा व वेलची पावडर घालून मिक्स करून मिश्रण परत २-३ मिनिट आटवून घेऊन विस्तव बंद करून पुरण थंड करायला ठेवा.
आता आपण त्रिपुर सुंदरी बनवणार आहोत. त्यामध्ये तवा गरम करायला ठेवा.
त्रिपुर सुंदरी बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचे लिंबा एवहडे गोळे बनवून घ्या. मग एक गोळा घेऊन लाटून त्यामध्ये २-३ टे स्पून पुरण भरून गोळा बंद करून लाटून घ्या. मग गरम तव्यावर त्रिपुर सुंदरी टाकून छान भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व त्रिपुर सुंदरी बनवून घ्या.