10 September 2024 Jyeshtha Gauri Pujan Mahiti, Muhurat, Puja Sahitya W Aarti In Marathi

Jyeshtha Gauri Pujan
10 September 2024 Jyeshtha Gauri Pujan Mahiti, Muhurat, Puja Sahitya W Aarti

10 सप्टेंबर 2024 जेष्ठ गौरी पूजन माहिती मुहूर्त पुजा साहीत्य आरती

10 September 2024 Jyeshtha Gauri Pujan Mahiti, Muhurat, Puja Sahitya W Aarti In Marathi

श्रावण व भाद्रपद हे दोन्ही महीने खूप पवित्र व धामधुमीचे मानले जातात. श्रावण महिन्यात प्रतेक दिवस महत्वाचा व त्या त्या दिवसाचे विशेष महत्व आहे.

The 10 September 2024 Jyeshtha Gauri Pujan Mahiti, Muhurat, Puja Sahitya W Aarti In Marathi can be seen on our You tube Chanel 10 September 2024 Jyeshtha Gauri Pujan Mahiti, Muhurat, Puja Sahitya W Aarti

श्रावण महिना संपला की आपल्याला भाद्रपद महिन्याचे वेध लागतात मग लगेच सर्वत्र गणपतीची धामधून चालू होते. महाराष्ट्रात गणपती बाप्पा चा सण खूप दणक्यात साजरा केला जातो. गणपती उत्सवात 10 दिवस इतके मंगलमय असतात की ते कसे जातात ते समजत सुद्धा नाही. गणपती बाप्पांची स्थापना करून झाली की लगेच चौथ्या दिवशी जेष्ठ गौरीच्या आगमनाची तयारी चालू होते. खर म्हणजे अगोदर पासूनच तयारी सुरू केली जाते. महाराष्ट्रात जेष्ठ गौरी पूजन खूप मनोभावे करतात.

महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या सजावटी बरोबर जेष्ठ गौरी पूजन ची सजावट पण पाहण्या सारखी असते. तसेच त्यामध्ये स्पर्धा सुद्धा घेतली जाते त्यासाठी चढाओढ सुद्धा लागते.

महाराष्ट्रात भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेष्ठगौरीचे आगमन होते. तेव्हा घरोघरी उत्साही व आनंदी वातावरण असते. . दृढ श्रद्धा व उत्कट भक्तीने गौरीचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील स्त्रिया सौभाग्य संवर्धनाच्या हेतूने हा सण मोठ्या आवडीने करतात. देवी पार्वती ही गौरीच्या रूपाने माहेरी येते अशी आपली समजूत आहे. गौरी ही स्त्रीची जीवाभावाची सखी आहे. काही जणी नदीकाठावरून आणलेले दोन खडे तर काही जणी तेरड्याची रोपे अशी प्रतीकात्मक गौर बसवितात तर काही जणी मुखवटे असलेली, भरजरी शालू नेसलेली, दागीन्यांनी नटलेली, साजरी गौर बसवताना दिसतात. जशी आपल्या घ्ररात प्रथा आहे तशी गौर बसवून पूजा करतात.

जेष्ठ गौरी पूजन कसे करावे व मुहूर्त:

पूजेची सामग्री, पूजेचे साहित्य, फुले, पत्री, अलंकार, पूजा, नेवेद्य व आरती:

आजकालच्या धकाधकीच्या दिवसात महिला आपले घरसंसार, नोकरी, आपले करीयर सांभाळून तारेवरची कसरत करून अगदी आवडीने व तितक्याच श्र्धेनी गौरी पूजन करून आपल्या घराला यश, संपती, संतती व कीर्ती मिळावी म्हणून वर मागतात.

जेष्ठ गौरी पूजन म्हणजे स्त्रीयांचा अगदी आवडता सण आहे. त्यासाठी काय-काय सामग्री व साहित्य लागते त्याची आगोदरच तयारी करून ठेवावी.

Jyeshtha Gauri Pujan
10 September 2024 Jyeshtha Gauri Pujan Mahiti, Muhurat, Puja Sahitya W Aarti

जेष्ठ गौरी पूजन कसे करावे व मुहूर्त:
10 सप्टेंबर 2024 मंगळवार जेष्ठ गौरी आगमन रात्री 8:02 मिनिटा पर्यन्त
11 सप्टेंबर 2024 बुधवार जेष्ठ गौरी पूजन
12 सप्टेंबर 2024 गुरुवार जेष्ठ गौरी विसर्जन रात्री 09:51 मिनिटा पर्यन्त

पूजेची सामग्री : जेष्ठ गौरी पूजन सर्व उपकरणे तांब्याची किंवा चांदीची वापरावीत तसेच स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. ह्यामध्ये ताम्हण, पळी-पात्र, तांब्या, पूजेचे ताट, समई, निरंजन, अगरबत्तीचे घर, घंटा, धूपपात्र, कपूरपात्र इ.

पूजेचे साहित्य : हळद-कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, सुपाऱ्या, नारळ, विड्याची पाने, गुळ-खोबरे, बदाम, खारका, तांदूळ, गहू, पंचामृत, दुध, दही, तूप, मध. साखर, ५ प्रकारची फळे, सुगंधी तेल, नाणी

फुले : फुलांचा हार, सुटी फुले, कमळ, केवडा, जाई, जुई, शेवंती

पत्री : आघाडा, बेल, दुर्वा, चाफा, डाळीब, धोत्रा, तुळस

अलंकार : बांगड्या, मणीमंगळसूत्र, साडी, हिरवी चोळी, खण व काही दागिने

गौरीच्या पूजेची तयारी अगोदरच करून ठेवावी म्हणजे आईन वेळेस पंचाईत होणार नाही. गौरी आणण्या पूवी घरातील प्रतेक कोपऱ्यात हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत. म्हणजे गौर घरात आली आहे असे म्हणतात. घरामध्ये गौरी बसवतांना भोवती आरस करतात. देवी पुढे फराळाचे जीन्नस ताट भरून ठेवतात. फराळाची ताटे भरताना लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव, करंजी ठेवतात. किंवा मिठाई सुद्धा ठेवतात. कुंची घातलेली बाळ बसवतात. पंचारतीने, उद्बतीने, अत्तर, गुलाबाने, हळद-कुंकुवाने व चंदनाच्या उटीने देवीची पूजा करतात. जेष्ठ गौरी येण्याच्या पहिल्या दिवशी शेपूची भाजी/मेथीची भाजी, खीर, वडे, अनारसे, लाडू व भाकरीचा नेवैद्य दाखवतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी मनोभावे पूजा करून नेवेद्यासाठी चटणी, कोशीबीर, पुरणपोळी, काटाची आमटी, भजी, अळूच्या वड्या, भात करतात. सौवाशिण म्हणून बोलवतात तिला हळद 0 कुकु लावून तीची ओटी भरतात व काही भेट वस्तु देवून तिला भोग जेवायला देतात. त्यादिवशी संध्याकाळी इतर स्त्रीयांना हळद-कुंकू साठी बोलवतात काही खाण्याचा पदार्थ व गरम गरम दूध सेवन करण्यासाठी देतात. रात्री गौर जागवतात. वेगवेगळे खेळ खेळले जातात गौरीची गाणी म्हटली जातात.

तिसऱ्या दिवशी गौरीच्या ओटीसाठी तांदूळ, खारीक, खोबरे, लेकुरवाळे, हळद-कुंकू, पानसुपारी घेतात. खारीक खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे पिवळ्या दोऱ्यात सात ठिकाणी गाठ्वून गळ्यात बांधतात. त्यादिवशी घावन घटले, दही-भात, गव्हल्याची खीर बनवून नेवेद्या दाखवतात. मग जेष्ठ गौरीचे विसर्जन केले जाते.

🌹 *आरती ( गौरी ) महालक्ष्मीची* 🌹

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.