17 September 2024 Anant Chaturdashi Shubh Muhurat Ganesh Visarjan Niyam In Marathi
17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्थी शुभ मुहूर्त गणेश विसर्जन नियम लक्षात ठेवा, बाप्पा प्रसन्न होतील
7 सप्टेंबर 2024 पासुन गणपती उत्सव सुरू झाला आहे व पंचांग नुसार 17 सप्टेंबर 2024 ह्या दिवशी भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथि ह्या दिवशी साजरी करावयाची आहे म्हणजेच ह्या दिवशी अनंत चतुर्थी असून गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित करायची आहे. ह्या दिवशी गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करून पुढील वर्षी लवकर यावे म्हणून प्रार्थना करतात.
The 17 September 2024 Anant Chaturdashi Shubh Muhurat Ganesh Visarjan Niyam In Marathi can be seen on our You tube Chanel 17 September 2024 Anant Chaturdashi Shubh Muhurat Ganesh Visarjan Niyam
हिंदू धर्मामध्ये गणेश भगवान ह्यांची प्रथम पूजा केली जाते. कोणत्या सुद्धा नवीन कामाची किंवा कार्याची सुरुवात करावयाची असेलतर गणपती बापाची पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या जीवनात सुख -समृद्धी मिळते. अनंत चतुर्थी ह्या दिवशी बाप्पाची पूजा अर्चा केल्याने मनोकामना पुर्ण होतात.
धार्मिक मान्यता अनुसार अनंत चतुर्थी ह्या दिवशी पुर्ण परिवारानी बाप्पाना निरोप देण्याच्या अगोदर पूजा करावीव मोदकाचा नेवेद्य दाखवावा. मग धूमधामित मिरवणूक काढून मग निरोप द्यावा. विसर्जन करताना काही नियम पाळावेत त्यामुळे गणपती बाप्पाची कृपा मिळेल.
गणेश विसर्जन शुभ मुहूर्त:
17 सप्टेंबर 2024 गणपती विसर्जन मुहूर्त
सकाळी 9 वाजून 10 मिनिट ते दुपारी 1 वाजून 46 मिनिट पर्यन्त
दुपारी 3 वाजून 18 मिनिट ते 4 वाजून 50 मिनिट पर्यन्त
संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिट ते 9 वाजून 19 मिनिट पर्यन्त
गणेश विसर्जन च्या वेळी काही नियम लक्षात ठेवा:
गणेश विसर्जनच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तिनी गणपती बाप्पाची पूजा करावी.
ह्या दिवही गणेश बाप्पाना मोदकाचा नेवेद्य दाखवावा त्याच बरोबर 56 भोग पण अर्पित करावा.
विसर्जन करण्यासाठी जाताना काळे किंवा डार्क निळे कपडे घालून जावू नये हे रंग अशुभ मानले जातात.
गणेशजींची पूजा करताना 21 दुर्वाची माळ अर्पित करावी.
गणेश विसर्जन साथी जाण्याच्या अगोदर बापाना आपल्या घरात नेऊन आणावे.
एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गणपती बाप्पाना निरोप देताना त्यांचे मुख घरच्या आत व पाठ बाहेरील बाजूस पाहिजे.
गणपती बाप्पाना विसर्जन स्थान वर घेऊन गेल्यावर परत कापुर आरती करावी.
तसेच गणेश पूजनचे साहित्य सुद्धा विसर्जित करावे, म्हणजे फुल, हार, दूर्वा इ.
गणेश जीनची मूर्ती हळू हळू पाण्यात विसर्जित करावी. एकदम पाण्यात सोडू नये.
गणपती बाप्पाचे विसर्जन करताना श्री गणेश मंत्र जाप जरूर करावा.