18 सप्टेंबर 2024 पासून पितृ पक्ष सुरू, श्राद्ध तिथी नियम व विधी
18 September 2024 Pasun Pitru Paksh Suru , Shradh Tithi Niyam W Widhi In Marathi
भाद्रपद पूर्णिमा आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या पर्यन्त 16 दिवसाचे पितृपक्ष आहे. त्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांची सेवा करतो. ह्या वर्षी 18 सप्टेंबर 2024 पासुन 2 ऑटोबर 2024 पर्यन्त पितृ पक्ष आहे. पितृ पक्ष मध्ये आपल्या पितरांना तर्पण, पिंडदान, श्राद्ध ब्राह्मण भोजन दिले जाते. त्याच बरोबर पितृपक्ष मध्ये तिथी नुसार पूजा करून त्यांना तृप्त केले जाते.
हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष च्या दिवसांचे खूप महत्व आहे. आपल्या परिवारातील ज्या पूर्वजांचे मृत्यू झाले असतील त्यांना पितृ मानले जाते. मृत्यू नंतर परत व्यक्तिचा जन्म होत नसेलतर सूक्ष्म लोक मध्ये राहतात मग पितरांचा आशीर्वाद सूक्ष्म लोकांमधून आपल्या परिवाराला मिळतो. पितृ पक्षमध्ये पितृ धर्तीवर येऊन आपल्या लोकांवर लक्ष केंद्रित करून आशीर्वाद देवून आपल्या समस्या दूर करतात.
पितृ पक्षमध्ये आपण आपल्या पितरांची आठवण काढतो. धार्मिक मान्यता अनुसार आपले पितृ नाराज झाले तर आपल्या घरातील उन्नती होण्यामद्धे बाधा येते. वर्षा मधील ह्या 15 दिवसांमध्ये श्राद्ध कर्म केले जाते. श्राद्ध पक्षला पितृ पक्ष किंवा महालय ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते. हिंदू पंचांग नुसार आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी पासून सर्व पितृ अमावस्या पर्यन्त पितृ पक्ष श्राद्ध पक्ष म्हणून ओळखले जाते.
पितृ पक्ष मध्ये अनुष्ठानची वेळ:
कुपुत मुहूर्त: 18 सप्टेंबर सकाळी 11 वाजून 15 मिनिट पासून दुपारी 12 वाजून 39 मिनिट पर्यन्त
रौहिणी मुहूर्त: दुपारी 12 वाजून 39 मिनिट पासून दुपारी 1 वाजून 28 मिनिट पर्यन्त
पितृपक्ष मध्ये पितरांची कशी आठवण काढावी:
पितृ पक्ष मध्ये आपण आपल्या पिरतांना नियमित पणे जल अर्पित करावे. हे जल दक्षिण दिशा च्या बाजूला तोंड करून दुपारच्या वेळी करावे. जल मध्ये काळे तीळ घालून हातात कुश ठेवावे.
पितृ पक्ष मध्ये पितरांना कसे लक्षात ठेवावे:
ज्या दिवशी आपल्या पूर्वजांची तिथी आहे त्याच दिवशी अन्न वस्त्रचे दान करावे. ह्याच दिवशी भुकेलेल्या जेवण द्यावे.
पितरांना कोण जल अर्पण करू शकते:
घरातील वरिष्ट सदस्य तर्पण देवू शकतात. किंवा घरातील कोणी पुरुष सुद्धा तर्पण देवू शकतात. नातवंडांना सुद्धा तर्पण देण्याचा अधिकार असतो. नाहीतर घरातील स्त्रिया सुद्धा तर्पण देवू शकतात.
फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.
1. सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या पितरांची आठवण काढली पाहिजे.
2.कुपुत वेळामध्ये पितरांना तर्पण देण्याचे विशेष महत्व आहे.
3.तर्पण देतांना पाण्यात काळे तीळ व कुश पाहिजे त्याचा अद्भुत परिणाम होतो.
4.जो कोणी पितृ पक्षचे पालन करतात व सात्विक भोजन करणे चांगले मानतात.
5.पितरांना सुगंधित पांढरी फुल अर्पित करावे. बिना वासाची फुल वर्जित आहेत.
6.दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना दान करावे.
7.पितृ पक्ष मध्ये रोज गीता वाचन कारवे.
8.श्राद्ध कर्म करताना कधी सुद्धा कर्ज घेऊन श्राद्ध करू नये.