2 ऑक्टोबर 2024 सर्व पितृ अमावस्या तिथी, श्राद्ध महत्व संपूर्ण माहिती
2 October 2024 Wednesday Sarva Pitru Amavasya Full Information In Marathi
सर्व पितृ अमावस्या पितरांच्या श्रद्धासाठी सर्वात खास दिवस आहे. सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांना जन्म-मरण च्या बंधना पासून मुक्ती मिळते.
पितृ पक्ष अमावस्या हा दिवस पितृ पक्षा मधील शेवटचा दिवस मानला जातो. ह्या दिवसाला आश्विन अमावस्या सुद्धा संबोधले जाते. पितृ पक्ष अमावस्या ह्या दिवशी सर्व प्रकारच्या आपल्याला माहिती असलेले किंवा माहिती नसलेले पूर्वज ह्यांना तर्पण, पिंडदान केले जाते, म्हणजेच ज्या पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसेल त्यांना सुद्धा पिंडदान केले जाते.
पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध कर्म केलेतर पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ह्याला पितृ मोक्ष अमावस्या सुद्धा म्हणतात.
आता आपण पाहू या सर्व पितृ अमावस्या कधी आहे त्याची तिथी कधी आहे व महत्व काय आहे.
सर्व पितृ अमावस्या तिथी:
सर्व पितृ अमावस्या 2 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी आहे. अमावस्या तिथी ला श्राद्ध केलेले परिवारातील सर्व पूर्वजांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी एक चांगला उपाय आहे. ज्याना आपल्या पूर्वजांची पुण्यतिथि माहीत नाही त्यांनी ह्या अमावस्या तिथीला श्राद्ध करावे.
सर्व पितृ अमावस्या 2024 श्राद्ध मुहूर्त: (Sarva Pitru Amavasya 2024 Time)
पंचांग अनुसार आश्विन अमावस्या 1 ऑक्टोबर 2024 रात्री 9:39 ला सुरू होत असून 2 ऑक्टोबर 2024 रात्री 12:18 मिनिट समाप्त होत आहे. श्राद्ध साठी कुतुप व रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो.
कुतुप मूहूर्त – सकाळी 11:46 – दुपारी 12:34
रौहिण मूहूर्त -दुपारी 12:34 -दुपारी 01:21
अपराह्न काळ – दुपारी 01:21 – दुपारी 03:43
सर्व पितृ अमावस्या ज्ञात-अज्ञात पितरांचे श्राद्ध:
अमावस्या पितरांची तिथी मानली जाते. पितृ पक्ष अमावस्याला सर्व पितरांचे श्राद्ध कर्म करण्याचे विशेष महत्व आहे. आपल्याला ज्या पूर्वजांची माहिती नाही त्यांचे सुद्धा श्राद्ध ह्या दिवशी करण्याचे विशेष महत्वाचे मानले जाते. म्हणजेच आपले काही अज्ञात पितर असतील जे पृथ्वीवर अवतरले असतील ते सुद्धा तृप्त होऊन जातील अशी आशा असते.
त्यांना तृप्त करणे खूप जरुरीचे असते नाहीतर ते नाराज होऊन जातात. मग वंशजचा शाप लागू शकतो व पितृ दोष पण लागू शकतो. म्हणूनच पितृ अमावस्या ह्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते.
सर्व पितृ अमावस्या महत्व: (Importance of Sarva Pitru Amavasya)
धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी केलेले श्राद्ध परिवारातील सर्व पूर्वजांच्या आत्माला शांती व प्रसन्न करण्यासाठी जरूरीचे आहे. ह्या दिवशी आपल्याला माहिती असणारे किंवा नसणारे पितर ह्यांचे श्राद्ध केले जाते. ज्याना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही. त्यांनी ह्या तिथीला श्राद्ध करावे. ह्या दिवशी तर्पण, पिंडदान व श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होऊन परिवारातील सदस्यांना आशीर्वाद देतात.
आपल्या परिवारातील जर कोणत्या व्यक्तिचा अकाली मृत्यू झाला तर ह्या दिवशी त्यांना तर्पण दिले जाते. असे केल्याने पितरांना संसारा मोहजाल मधून मोक्ष मिळतो. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी पितरांना तर्पण दिल्याने मानसिक शांती प्राप्त होते. त्याच बरोबर सुख समृद्धी प्राप्त होते. आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळून जीवनातील काष्टा पासुन मुक्ती मिळते.
दान करण्याचे महत्व: (Significance of donation)
हिंदू धर्मामध्ये दान करण्याला पुण्य मानले जाते. ज्यांची पद्धत पूर्वी पासून आहे.मान्यता अनुसार पितृ पक्षमध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्माच्या शांतीसाठी दान धर्म करणे शुभ मानले जाते. तसेच पुण्य मिळून आशीर्वाद सुद्धा मिळतो. पितृ पक्षमध्ये दान धर्म केल्याने दुप्पट पुण्य मिळते.
पितृ पक्षमध्ये शेवट्याच्या दिवशी अमावस्या तिथीला गोदान, तुपाचे दान करण्याचे विशेष महत्वाचे आहे. तसेच ह्या दिवशी ब्रह्मणाला व दिन दुबल्यांना भोजन व गुळ तांदूळ दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.