25 सप्टेंबर 2024 बुधवार अविधवा नवमी म्हणजे का? ह्या दिवशी कोणाचे व कोणी श्राद्ध केले पाहिजे संपूर्ण माहिती
25 September 2024 Avidhava Navami Shraddha Paksha Full Information In Marathi
आश्विन महिना कृष्ण पक्ष आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. ह्या पितृ पंधरवड्यात तिथी नुसार आपल्या सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षमध्ये नवमी हा दिवस सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. नवमी ह्या तिथीला अविधवा नवमी असे म्हणतात. ह्या दिवसाला नवमी श्राद्ध असे सुद्धा संबोधले जाते.
हिंदू शास्त्रा नुसार पितृ पक्ष गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश मध्ये संपूर्ण श्रद्धेने व मनोभावे योजले जाते. ज्या महिला मृत पावल्या आहेत व त्यांची तिथी माहीत नाही किंवा ज्यांचे पती हयात आहेत म्हणजे जीवित आहेत त्या मृत महिलांचे श्राद्ध अविधवा नवमी ह्या दिवशी केले जाते. ह्या वर्षी अविधवा नवमी 25 सप्टेंबर 2024 बुधवार ह्या दिवशी आहे. आता आपण पाहू या पितृ पक्ष मधील नवमी श्राद्ध म्हणजेच अविधवा नवमी ह्या दिवसाचे महत्व व अविधवा नवमीची संपूर्ण माहिती काय आहे.
अविधवा नवमी पितृ पक्ष मधील नवमी ह्या तिथीला एक शुभ हिंदू अनुष्ठान म्हणून मानली जाते. ही तिथी भाद्रपद कृष्ण पक्ष नवमी ह्या तिथीला येते.
अविधवा नवमी ही तिथी विवाहित महिलांसाठी समर्पित आहे ज्यांचे मृत्यू त्यांच्या पतीच्या अगोदर झाले आहेत. म्हणूनच अविधवा नवमी असे संबोधले जाते. ज्याचे पालन विधुर असणाऱ्यान कडून केले जाते. ह्या दिवशी हिंदू देवतांच्या आयवजी “धुरीलोचन” सारख्या देवतांची पूजा केली जाते. धुरी ह्या शब्दाचा अर्थ “धूर” व लोचन ह्यांचा अर्थ “डोळे” म्हणजेच ज्या देवतांचे डोळे धुरा मुळे अर्धे बंद असतात तर अविधवा नवमी ह्या दिवशी अश्या देवतांची पूजा अर्चा करून त्यांच्या कडे आशीर्वाद मिळण्यासाठी आव्हान केले जाते. अविधवा नवमीचे अनुष्ठान निराळे असते. ह्यालाच दुख नवमी असे सुद्धा मानले जाते.
अविधवा नवमी ह्या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते:
* ह्या दिवशी पती कडून दिवंगत सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध केले जाते.
* एक गोष्ट लक्षात ठेवा विधवा महिलांचे श्राद्ध अविधवा नवमी ह्या दिवशी केले जात नाही.
* जर सावत्र आई जीवित आहे व सखी आई दिवंगत झाली असेलतर मूर्त पावलेल्या आईच्या मुलांनी तिचे श्राद्ध कर्म केले पाहिजे.
* जर एका पेक्षा जास्त मातांचे निधन सधवा ह्या स्थितिमध्ये झाले असेलतर ह्या दिवशी सर्व मातांचे श्राद्ध अविधवा नवमी ह्या दिवशी बरोबरच करावे.
* दिवंगत स्त्रीचे निधन झाले आहे व तिला पुत्र नाही किंवा पुत्राचे सुद्धा निधन झाले आहे तर मुलांच्या मुलांनी अविधवा नवमी चे श्राद्ध करू नये.
अविधवा नवमीचे श्राद्ध कर्म कसे करायचे:
आश्विन मास कृष्ण पक्ष नवमी ह्या तिथीला मृत व्यक्तिच्या मोठ्या मुलांनी श्राद्ध कर्म केले पाहिजे. सकाळी लवकर उठून स्नान ध्यान करून महिला पूर्वजांच्या आत्माच्या शांतीसाठी तर्पण व पिंडदान केले जाते. ह्या दिवशी दिवंगत सुहागण, महिला, सुन, मुली ह्यांच्या साठी श्राद्ध केले जाते. त्यासाठी घराच्या मुख्य दरवाजा बाहेरील मुख्य अंगणात दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे वस्त्र अंथरूण त्यावर पूर्वजांचे फोटो ठेवा. फोटो समोर फुल अर्पित करा तिळाच्या तेलाचा दिवा व सुगंधित धूप लावा. मग स्वछ पाणी घेऊन त्यामध्ये तीळ घालून हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूनी पूर्वजांचे स्मरण करून तर्पण अर्पित करा.
मग दिवा लावून खीर पुरी व गुळाचा नेवेद्य अर्पित करा. मग आपल्या कडून काही चूक झाली असेलतर माफी मागा, तसेच ह्या दिवशी सुहागन महिलांना शृंगाराचे साहित्य दान करतात व दक्षिणा देवून आशीर्वाद घेतात.