28 सप्टेंबर इंदिरा एकादशी मुहूर्त, महत्व, पितरांची कृपा मिळण्यासाठी पूजा कशी करायची
28 September 2024 Indira Ekadashi Shubh Muhurat And Full Information In Marathi
इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद मिळतो. त्याच बरोबर पितरांना मोक्ष मिळतो. त्यामुळे ह्या एकादशीचे महत्व वाढते. ह्या वर्षी एकादशी 27 सप्टेंबर व 28 सप्टेंबर ह्या दोन दिवशी आली आहे त्यामुळे कंफ्यूजन झाले आहे.
चला तर मग पाहू या एकादशीचे व्रत कधी करायचे, पूजा कधी करायची, शुभ मुहूर्त व पितरांची कृपा मिळण्यासाठी पूजा कशी करायची. इंदिरा एकादशीचे व्रत खूप महत्वाचे मानले जाते.
कधी ठेवायचे इंदिरा एकादशीचे व्रत 2024:
हिंदू पंचांग अनुसार इंदिरा एकादशी 27 सप्टेंबर शुक्रवार दुपारी 1 वाजून 19 मिनिटां पासुन 28 सप्टेंबर शनिवार दुपारी 2 वाजून 50 मिनिट पर्यन्त आहे. शास्त्रा नुसार उदय तिथीमध्ये जर कोणती तिथी लागली तर त्यादिवशी ते व्रत करावे. इंदिरा एकादशीचे व्रत 28 सप्टेंबर शनिवार ह्या दिवशी करावे.
इंदिरा एकादशी पूजा शुभ मुहूर्त:
पूजेसाठी सर्वात उत्तम मुहूर्त 28 सप्टेंबर शुभ चौघडिया सकाळी 7 वाजून 42 पासून 9 वाजून 12 मिनिट पर्यन्त
संध्याकाळी अमृत चौघडिया मुहूर्त दुपारी 3 वाजून 11 मिनिट पासुन 4 वाजून 40 मिनिट पर्यन्त
इंदिरा एकादशी महत्व:
इंदिरा एकादशी महत्वाची आहे कारण की हे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होऊन ते वैकुंठ धाममध्ये जातात. त्याच बरोबर हे व्रत केल्याने आपल्याला सुद्धा स्वर्गाचे दार उघडते.
इंदिरा एकादशी पूजा विधि:
पद्म पुराणा नुसार इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास् पहिल्यांदा दशमी तिथीला पितरांचे श्राद्ध करावे.
दशमी तिथीला ब्राह्मण, गाईला घास, कावळा व कुत्रा ह्यांना भोजन द्यावे, त्याच बरोबर ह्या दिवशी कोणाची सुद्धा चहाडी वैगेरे करू नये.
दशमी ह्या तिथीला रात्री जमिनीवर चटई टाकून झोपावे. व दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला व्रत संकल्प करावा.
मग सकाळी स्नान करून चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून त्यावर श्रीहरी ची प्रतिमा स्थापित करावी.
मग भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांना वस्त्र अर्पित करून भोग दाखवावा.
शेवटी इंदिरा एकादशीची कथाचे वाचन करावे. मग भगवान विष्णु व माता लक्ष्मीची आरती करावी.