Easy Healthy Besan-Coconut Modak With Jaggery Without Syrup Recipe In Marathi
पौष्टिक टिकाऊ बेसन-नारळ मोदक गुळ घालून बाप्पासाठी बिना मावा बिना पाक सोपी पद्धत
बेसन-नारळ मोदक खूप स्वादिष्ट लागतात, तसेच बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. आज आपण बेसन-नारळ मोदक बनवणार आहोत पान साखर न वापरता गुळ घालून बनवणार आहोत. गुळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. बेसन नारळ चे मोदक छान खमंग लागतात.
The Easy Healthy Besan-Coconut Modak With Jaggery Without Syrup Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Easy Healthy Besan-Coconut Modak With Jaggery
बेसन नारळ चे मोदक बनवणार आहोत त्यासाठी पाक बनवण्याची गरज नाही तसेच आपण मावा सुद्धा वापरणार नाही. हे मोदक दिसायला सुबक दिसतात. अगदी वेगळी टेस्ट आहे बनवून पहा.
साहित्य:
1 कप बेसन
1/2 कप डेसिकेटेड कोकनट
1/2 कपला थोडे कमी तूप
3/4 कप गुळ (बारीक चिरून)
1 टी स्पून वेलची पावडर
8-10 काजू-बदाम
कृती: गूळ चिरून घ्या किंवा गुळाची पावडर वापरली तरी चालेल.
एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट थोडे परतून घ्या. मग थंड झाल्यावर त्याचे लांबट तुकडे करून घ्या.
मग त्याच पॅन मध्ये बेसन घालून मिक्स करून 7-8 मिनिट मंद विस्तवावर छान खमंग भाजून घ्या. आता बेसन एका बाउलमध्ये काढून घ्या.
त्याच कढई किंवा पॅन मध्ये डेसिकेटेड कोकनट 2-3 मिनिट फक्त रंग बदले पर्यन्त भाजून घ्या.
डेसिकेटेड कोकनट भाजून झालेकी बेसन काढलेल्या बाउलमध्ये काढून घ्या. मग मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर व गुळ घालून चांगले मिक्स करून घ्या.
आता त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालून परत मिक्स करून घ्या.
मोदक च्या मोल्डला आतून तूप लाऊन घ्या. मग त्यामध्ये मिश्रण भरून बोटांनी एक सारखे दाबून घ्या. मग हळुवार पणे मोल्ड उघडून मोदक बाहेर काढून एका प्लेट मध्ये ठेवा. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
मोदक बनवून झालेकी बाप्पा ला नेवेद्य दाखवा.