Easy Zatpat Sugar Free Modak For Ganpati Bappa Recipe In Marathi
सोपे इटुकले पिटुकले शुगर फ्री मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी
आज आपण मस्त पैकी शुगर फ्री मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अश्या प्रकारचे मोदक बनवताना साखर किंवा गुळ वापरणार नाही.
शुगर फ्री मोदक बनवताना आपण डेसिकेटेड कोकनट व ड्रायफ्रूटस वापरणार आहोत. मोदक झटपट व सोपे आहेत त्यामुळे ते बिघडण्याचा काही संबंधच येत नाही. तसेच खूप पौष्टिक सुद्धा आहेत व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहेत.
The Easy Zatpat Sugar Free Modak For Ganpati Bappa Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Easy Zatpat Sugar Free Modak
आपण अगदी छोटे छोटे मोदक बनवले आहेत जे आपण आरती नंतर प्रसाद म्हणून वाटू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 21 छोटे मोदक बनतात
साहित्य:
15-16 खजूर
3 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
8-10 बदाम
8-10 काजू
6-7 पिस्ता
1 टी स्पून खसखस
2 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
कृती: प्रथम खजूर धुवून पुसून बाजूला ठेवा. वेलची पावडर बनवून घ्या.
एका पॅन मध्ये डेसिकेटेड कोकनट 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, रंग थोडा बदलाला किंवा विस्तव बंद करून डेसिकेटेड कोकनट बाउल मध्ये काढून घ्या.
मग त्याच कढईमध्ये ड्रायफ्रूट थोडे गरम करून घ्या, थंड झाल्यावर त्याचे बारीक तुकडे करून बाजूला ठेवा.
आता त्याच कढई मध्ये 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये खजूर थोडा मऊ होई पर्यन्त 2-3 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. मग काढून एका प्लेट मध्ये ठेवून थंड झाल्यावर बिया काढून खजुराचे बारीक तुकडे करून घ्या. मग मिक्सरमध्ये एकदा ब्लेंड करून घ्या. खूप बारीक पेस्ट करायची नाही.
एका बाउल मध्ये डेसिकेटेड कोकनट, ड्रायफ्रूट, खजूर वेलची पावडर व 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या. पाहिजेतर मिक्सरमध्ये एकदा ब्लेंड केले तरी चालेल गरज पडली तर अजून एक चमचा तूप घालू शकता.
मोदकच्या मोल्डला आतून थोडेसे तूप लाऊन त्यामध्ये मिश्रण भरून बोटांनी दाबून मोदक बनवून घ्या, मग मोल्ड मधून मोदक काढून एका प्लेटमध्ये ठेवा. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
शुगर फ्री मोदक तयार झाले की गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवा.