In 10 Minutes Quick Ganpati Bappa Aarti Khirapat Prasad Modak Bhag-1 /10 Kids Recipe In Marathi
10 मिनिटात इन्स्टंट गणपती बाप्पा आरती खिरापत प्रसाद मोदक बिना गॅस मुलेसुद्धा बनवू शकतील
गणपती बाप्पाचे आगमन झाले की रोज सकाळी व संध्याकाळी आरती नंतर प्रसाद किंवा खिरापत काय बनवू शकतो ते आपण आता रोज 10 दिवस बघणार आहोत.
आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टंट मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला गॅसची जरूरत लागणार नाही आपण बिना गॅस मोदक बनवू शकतो. आपण अगदी 10 मिनिटांत मोदक बनवणार आहोत ही रेसिपी इतकी सोपी आहे की 8-10 वर्षाची मुले सुद्धा बनवू शकतात.
इन्स्टंट मोदक मस्त स्वादिष्ट लागतात. गणपती बाप्पा ना व मुलांना सुद्धा खूप आवडतील. तसेच ते आकर्षक सुद्धा दिसतात.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 11-15 मोदक बनतात
साहित्य:
1 कप डेसिकेटेड कोकनट
1/4 कप मिल्क पावडर
1/4 कप पिठीसाखर
1 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
4-5 केशर कड्या (1 टे स्पून दुधात भिजवून)
1 टे स्पून दूध
पिस्ता तुकडे
गुलाब पाकळ्या
मोदक मोल्ड
कृती: प्रथम 1 टे स्पून गरम दुधामध्ये केशर भिजत ठेवा. मोदक मोल्डला तूप लावून बाजूला ठेवा. पिस्ताचे तुकडे करून घ्या.
एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकनट घेऊन त्यामध्ये मिल्क पावडर, पिठीसाखर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
आता तयार केलेल्या मिश्रणात केसर दूध घालून मिक्स करून त्यामध्ये तूप घालून परत मिक्स करून घ्या. आता अजून 1 टे स्पून दूध घालून पिस्ताचे थोडे तुकडे व गुलाब पाकळ्या घालून मिक्स करून एक गोळा बनवून घ्या. मग मोदकच्या मोल्डच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
मोदकच्या मोल्डला आतून तूप लावल्यावर एका बाजूनी 3-4 पिस्ताचे तुकडे ठेवून मिश्रणाचा एक गोळा ठेवून मोल्ड बंद करून बोटांनी व्यवस्थित दाबून घेऊन हळुवार पणे उघडून मोदक बाहेर काढून घ्या, अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
मोदक बनवून झाले की गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवा.