In 5 Minutes Biscuits Modak For Bappa And Kids Bina Gas Recipe In Marathi
5 मिनिटांत बिस्किटस् मोदक मुलांचे व बाप्पाचे आवडीचे बिना गॅस रेसीपी मुलांसाठी भाग 2
आता गणपती उत्सव येत आहे तर बाप्पाना रोज आरती नंतर नेवेद्य दाखवायचा आहे. आज आपण इन्स्टंट मोदक भाग 2 बघणार आहोत. इन्स्टंट मोदक आपण गुड डे बिस्किटस् पासून बनवणार आहोत.
The In 5 Minutes Biscuits Modak For Bappa And Kids Bina Gas Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel In 5 Minutes Biscuits Modak For Bappa And Kids Bina Gas
बिस्किटस् मोदक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत व टेस्टि सुद्धा लागतात. बिस्किटस् मोदक मुले सुद्धा अगदी सहज बनवू शकतात तसेच अश्या प्रकारचे मोदक बनवण्यासाठी गॅसची जरूरत नाही.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 17-18 लहान मोदक बनतात
साहित्य:
15 गुडडे बिस्किटस्
1 टी स्पून तूप
7-8 काजू (तुकडे करून)
2 टे स्पून दूध
मोदक मोल्ड
इसन्स (बिस्किटस् मध्ये असतो)
कृती: बिस्किटस् चे तुकडे करून घ्या. काजूचे तुकडे करून घ्या. मोदकच्या मोल्डला आतून तूप लाऊन घ्या.
आता मिक्सर जार मध्ये बिस्किटस् चे तुकडे घेऊन ब्लेंड करून घ्या. मग बिस्किटस्ची पावडर एका बाउल मध्ये काढून घ्या, मग त्यामध्ये तूप घालून मिक्स करून घ्या, आता मिश्रणात प्रथम एक टे स्पून दूध घालून मिक्स करून घ्या, मग अजून एक टे स्पून दूध घालून काजूचे थोडे तुकडे घालून मिक्स करून आपण जसे पीठ मळतो तसे मळून घ्या.
आता मोदक साचा घेऊन त्यामध्ये काजूचे 2-3 तुकडे ठेवून त्यावर बिस्किटस् चे मिश्रण भरून बोटांनी दाबून घ्या. म्हणजे मोडकचा छान शेप येईल. मग हळुवार पणे साचा मधून मोदक काढून घेऊन प्लेट मध्ये काढून ठेवा. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
गुड डे बिस्किटस् चे मोदक बनवून झालेकी बाप्पा ला प्रसाद म्हणून दाखवा.