सारखी सारखी वाईट नजर लागते स्वतःला लागलेली नजर स्वतः कशी काढायची सोपे उपाय
Nazar Dosh Lakshan Najar Kadhayche Sope Satik Upay In Marathi
नजर लागली की व्यक्तीच्या जीवनात प्रगती होण्यास अडचणी येतात. त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत त्या वापरुन आपल्याला स्वतः ला नजर लागली असेलतर त्याचा उतारा काढू शकतो.
नजर दोष लागलेल्या व्यक्तीच्या जीवनात बऱ्याच प्रकारच्या परेशानी यायला सुरवात होते. आपले आरोग्य पासून आपल्या कामात सफलतासाठी बऱ्याच अडचणी येतात. नजर लागलेल्या व्यक्तीला प्रतेक क्षेत्रात निराशा येते. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्या वाईट व्यक्तीची नजर लागली तर त्याची साऱ्या कामात त्याला असफला येते मग त्या व्यक्तीला कोणत्या सुद्धा कामात लक्ष लागत नाही.
ज्योतिष शास्त्र नुसार नजर लागणे किंवा नजरदोष ला नकारात्मक ऊर्जा शी जोडले जाते. त्यामुळे शारीरिक आरोग्य पासून सफलता मिळणे ह्यामध्ये अडचणी येत राहतात. चला तर मग आपण पाहू या नजर लागण्याची कोणती लक्षण आहेत व आपली स्वतःची नजर कशी उतरवायची.
नजर लागण्याची कोणती लक्षण आहेत:
जर कोणाच्या घराला नजर लागली तर घरामध्ये वारंवार क्लेश होत राहतात.
घरात चोरीच्या घटना होतात व त्या घरात नेहमी अशांती राहते.
घरातील सदस्य कोणत्याना कोणत्या रोगांनी त्रस्त राहतात.
वाईट नजर लागल्यामुळे घरात दरिद्रता येते.
जर कोणाच्या उद्योग धंद्याला नजर लागते तेव्हा उद्योग व्यापार ठप्प होत जातो. बिजनेस मध्ये फायदा होण्याच्या आयवजी नुकसान होत जाते.
जर कोणत्या व्यक्तीला वाईट व्यक्तीची नजर लागली तर नजर लागलेली व्यक्ति कोणत्या तरी वाईट संगतीत फसून जाते. त्याची काम होणार असतील तर ती बिघडत जातात. त्याच बरोबर कोणत्याना कोणत्या रोगांनी ती व्यक्ति त्रस्त राहते.
स्वतः नजर कशी काढायची?
व्यापारमध्ये नजर लागली असेलतर कशी काढायची:
जर कोणत्या व्यक्तीच्या व्यापाराला नजर लागली असेलतर त्याने स्वतः नजर कशी काढायची तर व्यापाराच्या जागी चारही कोपऱ्यामध्ये एक-एक खिळा ठोकायचा असे केल्याने व्यापाराला लागलेली नजर लवकर उतरेल.
घराला लागलेली नजर कशी उतरवायची:
जर कोणाच्या घराला नजर लागली असेलतर शुक्रवारच्या दिवशी अशोकाच्या झाडाची पाने घेऊन त्याची एक माळ बनवून मुख्य दरवाजावर लावा. असे केल्याने घराला लागलेली नजर लवकर दूर होईल.
मुलांची नजर काढण्यासाठी:
जर तुमच्या मुलांना नजर लागली आहे तर एक कापसाची एक लांबट वात घेऊन ती वात मोहरीच्या तेलात बुडवून ठेवा. मग ती वात घेऊन मुलाच्या वरून तीन वेळा उतरा करा असे केल्याने मुलाला लागलेली नजर दूर होईल.
स्वतःची नजर कशी उतरवावी:
लोखनडाची एक अंगठी घाला. जर आपल्याला सारखी नजर लागत असेलतर त्यापासून वाचण्यासाठी हातामधील मधल्या बोटात अंगठी घाला.
काळा धागा बांधा:
जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या वर कोणाची वाईट नजर आहे तर आपल्या हातात काळा धागा बांधा असे केल्याने वाईट नजर दूर होईल.
हनुमान जीनचा शेंदूर:
स्वतःची नजर काढण्यासाठी हनुमान जिच्या मंदिरामधून शेंदूर आणून कपाळावर लाऊ शकता. त्यामुळे वाईट नजर दूर होईल.