16 ऑक्टोबर 2024 शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्त, पूजा महत्व, लक्ष्मी माताला कसे करायचे प्रसन्न
16 October 2024 Kojagari Puja Maa Laxmi Pujan Muhurat And Mahatw In Marathi
आश्विन महिन्यातील पूर्णिमा शरद पूर्णिमा किंवा कोजागिरी पूर्णिमा ह्या दिवशी महिला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व्रत करतात. असे म्हणतात की आश्विन पूर्णिमा च्या रात्री माता लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन होते. म्हणून ह्या दिवशी लक्ष्मी माताची कृपा मिळण्यासाठी लक्ष्मी माताची पूजा अर्चा केली जाते.
कोजागिरी पूर्णिमा शुभ मुहूर्त: (Kojagari Puja shubh Muhurat)
आश्विन महिन्यातील पूर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर बुधवार रात्री 8 वाजून 40 मिनिट पासून सुरू होत असून 17 ऑक्टोबर गुरुवार संध्याकाळी 4 वाजून 55 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून कोजागिरी व्रत बुधवार 16 ऑक्टोबर ह्या दिवशी ठेवायचे आहे.
कोजागिरी पूजा निशिता काळ: रात्री 11 वाजून 42 मिनिट पासुन 12 वाजून 32 मिनिट पर्यन्त
कोजागिरीच्या दिवशी चंद्रोदय: संध्याकाळी 5 वाजून 05 मिनिट
कोजागिरी पूर्णिमा पूजा महत्व: (Kojagari Puja Importance)
कोजागिरी पूजा नवरात्रीच्या दरम्यान केली जाते. जी विजया दशमी म्हणजेच दसराच्या पाचव्या दिवशी केली जाते. असे म्हणतात की समुद्र मंथनच्या वेळी धनाची देवी माता लक्ष्मी शरद पूर्णिमाच्या दिवशी प्रकट झाली होती. म्हणूनच माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते. तसेच ह्या दिवशी भक्त आपल्या घरात मातीचा दिवा लाऊन लक्ष्मी माता ला आमंत्रित केले जाते. तसेच दारे खिडक्या उघड्या ठेवतात त्याच बरोबर शेत चांगली पिकू द्या म्हणून प्रार्थना केली जाते.
माता लक्ष्मीला करा अश्या प्रकारे प्रसन्न:
कोजागिरीच्या दिवशी खीर बनवून एका भांड्यात चाँदनी रात्री चंद्र प्रकाशात ठेवतात. पूजामध्ये हीच खीर माता लक्ष्मीला भोग म्हणून दाखवली जाते. चंद्र दर्शन झाल्यावर घरच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला 11 देवे लावले जातात. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या साधकावर द्या दृष्टी दाखवते.
शरद पूर्णिमा पूजाविधी:
शरद पूर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. समजा हे शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून आंघोळ करावी. व स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
एका लकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कापड घालून गंगाजल शिंपडावे.
आता ह्या चौरंगावर माता लक्षीची मूर्ती किंवा फोटो ठेवून लाल रंगाची चुनरी घालावी. मग धूप, दिवा, सुगंधित फूल पान सुपारी व नेवेद्य अर्पण करावा
मग माता लक्ष्मी ची पूजा करून लक्षीचालीसा वाचावी.
मग संध्याकाळी घर स्वच्छ करून आपल्या घरच्या मुख्य दरवाजा समोर सडा रांगोळी काढून लक्षीची पावल काढून आपल्या घरातील देव्हाऱ्या पर्यन्त काढावी.
मग संध्याकाळी भगवान विष्णुची पूजा करून तुपाचा दिवा लावावा. व त्याच बरोबर तुळशीच्या समोर सुद्धा रांगोळी काढून तुपाचा दिवा लावावा.
मग तांदळाची व गाईच्या दुधाची खीर बनवून चांदीच्या भांड्यात ठेवून चंद्र प्रकाशात ठवावी. रात्र जागवून सकाळी सर्वाना खीर प्रसाद म्हणून द्यावी.