7 ऑक्टोबर 2024 ललिता पंचमी व्रत महत्व व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सटीक उपाय
7 October 2024 Importance Of Lalita Panchami Vrat For Children’s Future In Marathi
आता सध्या शारदीय नवरात्री चालू आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये आश्विन मास मध्ये शुल्क पक्ष पंचमी ह्या तिथीला ललिता पंचमी व्रत केले जाते. माता ललिताला त्रिपुर सुंदरी ह्या नावानी ओळखले जाते. पंचांग नुसार ह्या वर्षी 7 ऑक्टोबर 2024 सोमवार ह्या दिवशी ललिता पंचमी व्रत करायचे आहे. ललिता माता ही देवी सतीचे एक रुप मानले जाते. ललिता देवी ही दहा महाविद्या मधील एक देवी मानली जाते.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता बरोबरच ललिता पंचमी व भगवान भोलेनाथ ह्यांची पूजा करणे विशेष महत्वाचे मानले जाते. असे म्हणतात की माता राणी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सर्व दुख-कष्ट दूर करते व उज्ज्वल जीवनासाठी आशीर्वाद देते. आर्थिक समस्या दूर होतात व जीवन सुखमय होते. ललिता पंचमी हे व्रत साधरण पणे गुजरात व महाराष्ट्र मध्ये केले जाते.
आता आपण पाहूया ललिता व्रत शुभ मुहूर्त, पूजा साहित्य व पूजाविधी:
ललिता पंचमी व्रत मुहूर्त:
पंचमी तिथी आरंभ: पंचांग नुसार 7 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 वाजून 47 मिनिट आश्विन मास शुल्क पक्ष पंचमी ह्या तिथीला आरंभ होत आहे.
तिथी समाप्ती: 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11 वाजून 17 मिनिट
त्यामुळे उदय तिथी 7 ऑक्टोबरला ललिता पंचमी व्रत ठेवायचे आहे.
पूजा साहित्य:
नारळ, हळद-कुंकू, अक्षता, अबीर, गुलाल, दिवा, तूप, फुल, लाल वस्त्र, अत्तर, मौली, पाणी, बसण्यासाठी आसन, कच्चे दूध
पूजाविधी:
ललिता पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे धरण करावे.
चौरंग,वर लाल किंवा पिवळे वस्त्र घालून पूजेसाठी शालिग्राम, भगवान कार्तिकेय, शिव-पार्वतीचा फोटो ह्यांची स्थपना करावी.
मग पूर्व किंवा उत्तर ह्या दिशेला तोंड करून माता ललिताची पूजा करावी. माताला लाल फुल व वस्त्र अर्पित करावे व ललिता सहस्त्रनाम चे वाचन करावे व मंत्र जाप करावा.
ललिता पंचमीच्या दिवशी करा हे उपाय:
ललिता पंचमी हा खूप महत्वाचा दिवस असून ह्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उपाय करून पहा त्याचा आपल्या मुलांना नक्की फायदा होऊन त्यांच्या अभ्यासात प्रगती होऊन त्याचे भविष्य उत्तम होईल. ललिता पंचमी ही तिथी माता सरस्वतीची तिथी आहे. ती विदेची देवता आहे. तिची पूजा अर्चा केली तर धनप्राप्ती होते व विद्याप्राप्ती होते.
प्रतेक आईला वाटत असते की आपल्या मुलांनी सर्व ठिकाणी प्रगती व करियर करावे नाव कामवावे. हा उपाय करताना साधरण पणे 1-2 वर्षा पर्यन्तच्या मुलांसाठी करू नये. जी मुले शाळेत जात असतील तर त्यांच्या साठी त्यांच्या आईने, आजीने किंवा घरातील कोणत्या सुद्धा स्त्रीनेमुलांसाठी हा उपाय करावा जर मोठी मुले असतील तर ते स्वतः हा उपाय करू शकतात.
ललिता पंचमी पहिला उपाय:
चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र घालावे त्यावर माता सरस्वतीचा फोटो ठेवावा त्याची पूजा करावी. व पुढे दिलेला मंत्र 21 वेळा म्हणावा, लहान मुलाच्या साठी मुलांच्या आईने मंत्र म्हणावा मुले मोठी असतील तर त्यांनी स्वतः मंत्र म्हणावा.
मंत्र:
ॐ ऐं ह्रीं क्लीं महासरस्वती देव्यै नमः
दूसरा उपाय:
सरस्वती माताच्या फोटोची पूजा करून फुले अर्पित करावी. मग आपल्या बोटामधील सोन्याची किंवा चांदीची अंगठी स्वच्छ धुवून घ्या. मग ती अंगठी मधामध्ये बुडवून घ्यावी. मग आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवर अंगठीनि “ऐं” असे लिहावे व लगेच तोंड बंद करायला सांगावे. असे केल्याने मुलांची बुद्धी शार्प होऊन एकदा वाचले तरी लक्षात राहते.
तिसरा उपाय:
मुलांच्या स्टडी टेबलवर माता सरस्वतीचा फोटो ठेवावा व त्यावर एक मोर पीस लावावे त्यामुळे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते. वर दिलेले उपाय आपण दिवस भरात कधी सुद्धा करू शकता.