धनत्रयोदशीला 2024 यम दीपदान विधी कसे, कधी व कोठे करावे संपूर्ण माहिती
Dhanteras 2024 Yamdeep Dan Time And Importance in Marathi
हिंदू धर्मा मध्ये 5 दिवसाची दिवाळी साजरी करतात व त्याची सुरुवात धनत्रयोदशी ह्या दिवसा पासून होते. धनत्रयोदशी ह्या दिवशी सोने-चांदी दागिने किंवा इतर कोणत्या वस्तुची खरेदी करणे शुभ मानले जाते.
पंचांगा नुसार 29 ऑक्टोबर 2024 मंगळवार ह्या दिवशी धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्त वर माता लक्ष्मी, गणेशजी, कुबेर देवता, व धन्वंतरी देवाची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे. त्याच बरोबर धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान यम ह्यांचीसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारणकी त्याचे विशेष महत्व आहे.
धनत्रयोदशी ह्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर चार मुखी दिवा लावायचा आहे. धार्मिक मान्यता अनुसार वर्षातून एकदा धनत्रयोदशी ह्या दिवशी घरातील पूजा अर्चा दिवे लावून झाल्यावर एक कणकेचा चार मुखी दिवा बनवून त्यामध्ये दोन वातीची एक एक वात करून त्यामध्ये मोहरीचे तेल किंवा आपण घरात जे तेल वापरतो ते घालून दक्षिण दिशेला दिव्याची वात ठेऊन लावावा असे केल्याने यमराज प्रसन्न होऊन आपल्या घरात सुख-शांती व आरोग्याचे वरदान देतात.
यम दीपक कसा बनवायचा:
एका बाउलमध्ये 1 कप कणिक घेऊन त्यामध्ये थोडी हळद घालून मिक्स करा पण त्यामध्ये मीठ आजिबात घालायचे नाही. मग कणिक मळून एक भाग मोठा व 2 भाग छोटे करून घ्या. मोठ्या भागाचा चार मुखी दिवा बनवावा, व 2 लहान भागांच्या दोन मुठी बनवाव्या. मग त्यामध्ये दोन वातीनची एक वात करून मोहरीचे तेल किंवा आपल्या घरातील तेल घालून दिवा तयार करावा. मग प्रदोष काळात लावावा.
दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता थोडे तांदूळ ठेवावे मग त्यावर दिवा ठेवून लावावा मग दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पित करावी व घरातील सर्व व्यक्तिनी हात जोडून दीर्घायुषसाठी प्रार्थना करावी असे केल्याने घरात अपमृत्यू होत नाही असे म्हणतात.
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त:
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त: संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिट ते रात्री 8 वाजून 13 मिनिट पर्यन्त
पूजा शुभ मुहूर्त: संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिट ते 8 वाजून 13 मिनिट
यम दीपदान: संध्याकाळी 6:30 ते 8.00 पर्यन्त
धनत्रयोदशी ह्या दिवशी दिवा का लावावा?
धनत्रयोदशी ह्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर, गणेशजी, भगवान धन्वंतरी व त्याच बरोबर भगवान यम ह्यांची पूजा करून दीप दान केले जाते हे दीप दान केल्याने अकाल मृत्यू ची भीती नाहीशी होते. दक्षिण दिशाचे स्वामी भगवान यम आहेत. म्हणून दक्षिण दिशेला चार मुखी दिवा लावून त्यांना प्रसन्न केले जाते. मग आपल्याला सुख-शांती व आरोग्य चा आशीर्वाद प्राप्त होतो.