24 ऑक्टोबर 2024 गुरु पुष्यामृत योग ह्या गोष्टी केल्यातर लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन आर्थिक समस्या दूर होतील
Guru Pushya Yog 2024 Full Information In Marathi
धार्मिक मान्यता अनुसार 2024 मध्ये धनत्रयोदशी व दिवाळी च्या पहिले पुष्य नक्षत्र येणे खूप खास व शुभ मानले जाते. हिंदू कॅलेंडर नुसार 24 ऑक्टोबर ह्या दिवशी गुरुवार आहे व त्या दिवाशी गुरु पुष्य नक्षत्र असून शुभ संयोग आहे जो कार्तिक महिन्यात आहे.
ह्या पुष्य नक्षत्रला नक्षत्राचा राजा मानले जाते. जो 27 नक्षत्रा पैकी 8 व्या स्थाना वर आहे. हे नक्षत्र निशतीच प्रतेक दृष्टीने संपन्नता व आथिक लाभ देणारे आहे. व प्रतेक घरात आनंद घेऊन येणारा आहे. ह्या योगामध्ये गृह प्रवेश, नविन वही लेखन, धन संच, प्रॉपर्टी व वाहन खरेदी करणे व सोन्याचे दाग दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
24 ऑक्टोबर 2024 गुरुवार ह्या दिवशी गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, व अमृत योग आहते. ह्या दिवशी अष्टमीचे व्रत पण ठेवू शकता. ज्योतिष शास्त्रा नुसार ह्या दिवशी केलेले कार्य दीर्घ काळा पर्यन्त फळ देणारे आहे.
गुरु पुष्य नक्षत्रच्या दिवशी काय करावे:
* नविन व्यापराची सुरवात गुरु पुष्य नक्षत्र ह्या दिवशी करणे सर्व्ह सर्व श्रेष्ठ मानले जाते.
* ह्या दिवशी श्री भगवान विष्णु व लक्ष्मी माताचे पूजन करावे. तसेच श्रीयंत्र खरेदी केल्याने समृद्धी येते.
* जर आपण तंत्र मंत्रची सिद्धी करणार असाल तर गुरु पुष्य नक्षत्र हा दिवस शुभ आहे नक्कीच सफलता मिळेल.
* गुरु पुष्य नक्षत्र दिवशी लहान मुलांचे जावळ काढले जाते.
* गुरु पुष्य नक्षत्र दिवशी गाईला गुळ सेवन करण्यास दिला तर आर्थिक लाभ होतो.
* जर जन्म कुंडलीमद्धे गुरु दोष असेलतर गुरु पुष्य दिवस गुरु दोषचा वाईट प्रभाव काढण्यासाठी चांगला आहे.
* गुरु पुष्य नक्षत्र ह्या दिवशी जमीन, प्रॉपर्टी, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते.
* गुरु पुष्य नक्षत्र ह्या दिवशी एक चांदीचा तुकडा खरेदी करून त्याचे पूजन केल्यास आर्थिक संकट दूर होते.
* गुरु पुष्य नक्षत्र दिवशी दुकान असेलतर दक्षिणवर्ति शंख ठेवल्यास व्यापारात निरंतर वृद्धी होते.
* गुरु पुष्य नक्षत्र ह्या दिवशी सोन्याचे लहान मोठे दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते.
* गुरु पुष्य नक्षत्र ह्या दिवशी नविन काम चालू करणे किंवा बंद झालेले काम सुरू केल्याने 99.99% सफलता मिळते.