शारदीय नवरात्री 2024 तिथी,वेळ,घटस्थापना मुहूर्त, पूजा साहित्य, पूजा विधी अष्टमी,नवमी व देवीची 9 रुप संपूर्ण माहिती
Navratri 2024 Tithi, Ghatsthapna Muhurt, Puja Sahitya, Puja Vidhi Mata 9 Avatar In Marathi
3 ऑक्टोबर 2024 गुरुवार ह्या दिवसा पासून नवरात्री सुरू होत आहे. नवरात्रीचा प्रतेक दिवस देवीच्या 9 रूपाना समर्पित आहे.
3 ऑक्टोबर 2024 पासुन नवरात्री आरंभ होत असून 12 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी विजया दशमी आहे. संपूर्ण भारतात नवरात्री हा सण अगदी भक्ति भावाने साजरा केला जातो. देवीचे माताचे भक्त बुराई पर अच्छाई की जीत ह्या भावनेने हा सण साजरा करतात. नवरात्री ह्या साणामध्ये बरेच भक्त नऊ दिवसाचे उपवास करतात. तर काही भक्त नवरात्रीचा पहिला दिवस व आठवा दिवस ह्या दिवशी उपवास करतात. देवी माताची भक्ति भावाने पूजा अर्चा आराधना करतात.
नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात महिला नऊ दिवस संध्याकाळी भोंडला करतात म्हणजे फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात व विविध खिरापति वाटतात. तर गुजरात मध्ये दांडिया म्हणजेच गरभा खेळतात. बंगालमध्ये दुर्गा पूजाची भक्ति भावाने पूजा अर्चा केली जाते.
शारदीय नवरात्रि 2024 तिथि:
शारदीय नवरात्रि 3 ऑक्टोबर 2024, गुरुवार सुरू होत असून 12 ऑक्टोबर 2024 शनिवार ह्या दिवशी समाप्त होत आहे.
नवरात्री मधील हे नऊ दिवस खूप शुभ मानले जातात. कारणकी देवी माताची रोज एक अशी नऊ रुपांची पूजा केली जाते त्याचे विशेष महत्व सुद्धा आहे. संपूर्ण भारतात घरो घरी व मंदिरात प्रार्थना, उपवास व उत्सव साजरा केला जातो.
घटस्थापना मुहूर्त 2024:
नवरात्री हा सण घटस्थापना करून सुरू केला जातो. कलशाची स्थापना हे नवरात्रीचे प्रतीक आहे. जे देवी माताची घरातील उपस्थितीचे प्रतीक मानले जाते.
नवरात्री घटस्थापना मुहूर्त: 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार सकाळी 6 वाजून 15 मिनिट 7 वाजून 22 मिनिट पर्यन्त
घटस्थापना अभिजीत मुहूर्त: सकाळी 11 वाजून 46 मिनिट ते दुपारी 12 वाजून 33 मिनिट पर्यन्त
पंचांग नुसार शुभ मुहूर्तवरच घटस्थापना करावी.
अष्टमी तिथी 2024:
शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी किंवा महा अष्टमी ह्या नावांनी ओळखला जातो. अष्टमी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. आश्विन शुक्ल पक्ष तिथी 10 ऑक्टोबर 2024 दुपारी 12 वाजून 31 मिनिट पासून सुरू होत असून 11 ऑक्टोबर 2024 दुपारी 12 वाजून 06 मिनिट समाप्त होत आहे.
अष्टमीच्या दिवशी किंवा नवमी च्या दिवशी लहान मुलीनची पूजा केली जाते. पूजा करताना 9 मुलीची पूजा करतात त्याना देवीचे रुप मानले जाते.
महा नवमी तिथी 2024:
शारदीय नवरात्री महानवमी 12 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी आहे. हिंदू कॅलेंडर नुसार आश्विन शुक्ल पक्ष नवमी तिथी 11 ऑक्टोबर 2024 दुपारी 12 वाजून 06 मिनिट पासून सुरू होत असून 12 ऑक्टोबर 2024 सकाळी 10 वाजून 28 मिनिट पर्यन्त आहे.
नवरात्र घटस्थापन पूजा साहित्य:
एक चौरंग, त्यावर वस्त्र घालावे, तांब्याचा कलश पाणी भरून किंवा चांदीचा किंवा मातीचा कलश, परात मातीची किंवा बांबूची टोपली,(नसेल तर केळीच्या पानावर मातीचा 2” थर मातीचा करावा) नारळ, हळद-कुंकू, आंब्याची किंवा विडयाची 5 पाने, लाल रंगाचे कापड, लाल दोरा (शुभ कार्यसाठी मनगटावर बांधतात तो) 2 सुपारी (एक सुपारी गणपती म्हणून ठेवण्यासाठी व दुसरी कलशात ठेवण्यासाठी), तांदूळ (अक्षता), अत्तर, नाणी, दूर्वा, हार, फुले, माती (चंगल्या प्रतीची माती), सात धान्य (सातू, तीळ, तांदूळ, मूग, ज्वारी, हरभरा, व गहू ), रांगोळी व रंग, समई व वात, तेल, घंटा देवीसाठी नेवेद्य (जर तुम्हाला सजवायचे असेल तर थाळी भोवती फुलाची आरास करावी
घटस्थापना किंवा कलश स्थापना कशी करायची:
• पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग ठेवावा त्यावर स्वच्छ लाल रंगाचे कापड घालावे व बाजूनी छान रांगोळी काढून रंग भरावे.
• प्रथम आपण अगदी चांगल्या प्रतीची माती घेऊन चाळून घ्या.मातीचे दोन भाग करून घ्या. एक भाग तसाच ठेवा दुसऱ्या भागात बिया घालून मिक्स करा.
• एक स्टीलची थाळी किंवा परात चौरंगावर ठेवावी त्यामध्ये मातीची थाळी किंवा परडी ठेवावी. मग त्यामध्ये पहिल्या भागाची माती पसरवून त्यावर दुसऱ्या भागाची बिया मिक्स केलेली माती हलक्या हातांनी पसरून घ्या (आजिबात दाबायची नाही). मग थोडेसे पाणी शिंपडायचे.
• आता आपण कलश तयार करायचा आहे. कलश घेऊन वरच्या बाजूला लाल धागा बांधून हळद-कुकु चारही बाजूला लावा. मग त्यामध्ये गंगाजल भरून घ्या. जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. त्यामध्ये सुपारी, अत्तर, दूर्वा, अक्षता, फूल व नाण घाला.
• कलश वरती पाच आंब्याची किंवा विडयाची पाने ठेवा. एक नारळ घेऊन त्याला हळद-कुकु लावावे. मग नारळ कलशावर ठेवावा. कलशावर हळद-कुकु-अक्षता व फूल वाहावे.
• बाजूला समईमध्ये वात लावून तेल घालून बारीक वात लावावी म्हणजे ती जास्त वेळ टिकते ही समई अखंड तेवत ठेवावी.
• रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा, आरती, आराधना करावी व देवीचा मंत्र म्हणावा. रोज कलशाच्या बाजूनी मातीवर पाणी शिंपडावे. रोज सकाळ संध्याकाळ देवी मातेला नेवेद्य दाखवावा. रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ घालावी.
शरद नवरात्रि देविमाताच्या नऊ रूपांची पूजा:
1) माता शैलपुत्रिची पूजा – पहिला तिथी 3 ऑक्टोबर 2024, गुरुवार
2) माता ब्रह्मचारिणी – द्वितीय तिथि 4 ऑक्टोबर 2024 शुक्रवार
3) माता चंद्रघंटाची पूजा – तृतीया तिथि 5 ऑक्टोबर 2024 , शनिवार
४) माता कुष्मांडाची पूजा- चतुर्थी तिथि 6 ऑक्टोबर 2024, शनिवार
५) माता स्कंदमाताची पूजा- पंचमी तिथि 7 ऑक्टोबर 2024, रविवार
६) माता कात्यायनीची पूजा- षष्ठी तिथि 8 ऑक्टोबर 2024, सोमवार
७) माता कालरात्रिची पूजा- सप्तमी तिथि 9 ऑक्टोबर 2024, मंगलवार
8) महागौरीची पूजा- अष्टमी तिथि 10 ऑक्टोबर 2024, बुधवार
9) माता सिद्धिदात्रीची पूजा- नवमी तिथि 11 ऑक्टोबर 2024, गुरुवार
10) शारदीय नवरात्रिच्या व्रताचे पारायण- दशमी तिथि 12 ऑक्टोबर 2024, शुक्रवार शारदीय नवरात्रि चे पारायण व माता दुर्गा चे विसर्जित करतात.