16 ऑक्टोबर 2024 कोजागिरी पूर्णिमा शरद पूर्णिमा सटीक उपाय लक्ष्मीप्राप्ती व प्रेम प्राप्तीसाठी
Sharad Purnima Kojagari Purnima 2024 Satik Upay In Marathi
सनातन पंचांग अनुसार शरद पूर्णिमा किंवा कोजागिरी पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा अर्चा केली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी मनोभावे पूजा केली तर प्रेम संबंध चांगले होतात व धन प्राप्ती होऊन पैशा संबंधित अडचणी दूर होतात. चला तर मग पाहूया कोणते खास उपाय केले तर आपल्या अडचणी दूर होतील.
आश्विन महिन्यातील पूर्णिमा ह्या दिवसाला शरद पूर्णिमा असे सुद्धा संबोधतात, किंवा रास पूर्णिमा असे सुद्धा म्हणतात. कारण की ह्या दिवसा पासून शरद ऋतु सुद्धा सुरू होतो. ही वर्षी 16 ऑक्टोबर ह्या दिवशी शरद पूर्णिमा साजरी करायची आहे.
धार्मिक ग्रंथा नुसार शरद पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मी व चंद्र देवताची पूजा करणे शुभ मानले जाते. ह्या दिवशी खीर बनवून चंद्र प्रकाशात ठेवतात मग दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सेवन करतात त्यामुळे आपली तबेत चांगली राहते व सुख समृद्धी मध्ये वाढ होते. शरद पूर्णिमाच्या रात्री काही खास उपाय केले तर प्रेम संबंध सुधारतात व आर्थिक समस्या पण दूर होतात
शरद पूर्णिमा मुहूर्त:
16 ऑक्टोबर 2024 बुधवार रात्री 8 वाजून 40 मिनिट सुरू होत असून
17 ऑक्टोबर 2024 गुरुवार संध्याकाळी 4 वाजून 55 मिनिट पर्यन्त
कोजागिरी पूर्णिमा किंवा शरद पूर्णिमा रात्री करावयाचे उपाय:
1. माता लक्ष्मीला पान-सुपारी अर्पित करा:
आश्विन पूर्णिमा ह्या दिवशी देवी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करणे व व्रत करणे शुभ मानले जाते, ज्या व्यक्ति आर्थिक परेशानी मध्ये आहेत त्यांनी ह्या दिवशी धन प्राप्तीसाठी व लक्ष्मी माताची कृपा मिळण्यासाठी विशेष पूजा व उपासना केली पाहिजे. त्यासाठी 5 विडयाची पाने घेऊन प्रतेक पानावर एक एक लवंग, हिरवी वेलची, सुपारी व कॉईन ठेवून मग पूजा झाल्यावर ह्या सर्व वस्तु एका लाल रंगाच्या कापडात बांधून घरातील तिजोरी मध्ये आपण जेथे धन ठेवतो तेथे ठेवावे. असे म्हणतात की हा उपाय केल्याने आर्थिक समस्या लगेच दूर होण्यास मदत होते.
2. मंत्र जाप करा:
कोजागिरी पूर्णिमा ह्या दिवशी रात्री लक्ष्मी माताच्या फोटो किंवा मूर्ती समोर तुपाचे 5 दिवे लाऊन लोकरीच्या आंसनावर पद्मासनमध्ये बसावे. मग माता लक्ष्मी समोर बसून ध्यान लाऊन बसून पुढे दिलेला मंत्र 11 जाप माळा म्हणावा. त्यामुळे लवकरच शुभ समाचार मिळेल.
मंत्र:
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः’
3. मखाना खीर अर्पित करावी:
ग्रंथाच्या नुसार पाण्यामधून उत्पन्न हेणारे, व पांढरे शुभ्र असणारे मखाने माता लक्ष्मीला अति प्रिय आहेत. शरद पूर्णिमाच्या दिवशी संध्याकाळी पूजा झाल्यावर लक्ष्मी माताला मखणे जरूर अर्पित करावे. त्यामुळे घरात सुख शांती, समृद्धी व सौभाग्यमध्ये वृद्धी होते.
4. लवंगचे दिवे लावावे:
शरद पूर्णिमाच्या संध्याकाळी गव्हाच्या पिठा घेऊन मळून त्याचे 5, 7 किंवा 11 दिवे बनवावे, सर्व दिव्यामध्ये एक एक कापसाची वात, तूप व लवंग घालावे, माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी हे सर्व दिवे लावावे मग आपल्या मनोकानमा किंवा समस्या सांगाव्या. देवी माताच्या कृपेने आपल्याला समस्या पासून लवकरच मुक्ती मिळेल व सर्व मनोकामना पुर्ण होतील.
5. चाँदनी स्नान करावे:
चाँदनी स्नान करावे म्हणजे शरद पूर्णिमाच्या रात्री पती-पत्नीने बरोबरच स्नान करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्याला माधुमास असे सुद्धा म्हणतात. असे म्हणतात की ह्या दिवशी पती-पत्नी ने एकत्र स्नान केले तर प्रेम संबंध सुधारतात. तसेच ह्या दिवशी दुधाची खीर बनवून रात्रभर चंद्र प्रकाशात ठेवून सकाळी प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास सौभाग्य व स्वस्थमध्ये वृद्धी होते.