शारदीय नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 देवी मातांना त्यांचा आवडतीचा भोग व फुल अर्पित केल्यास आपल्या मनोकामना पुर्ण होतात.
Shardiya Navratri 2024: 9 Days 9 Bhog And 9 Types Of Flowers To Fulfill Your Wishes In Marathi
3 ऑक्टोबर 2024 गुरुवार पासून हिंदू लोकांचा नवरात्री अतिशय शुभ सण चालू होत आहे. नवरात्री हा सण 9 दिवस आहे. ह्या मध्ये 9 दिवस 9 देवीमाताच्या रुपांची पूजा अर्चा केली जाते. ह्या दिवसांमध्ये माता ची चौकी सजवली जाते व 9 दिवस उपवास केले जातात. तसेच नऊ दिवस देवी माता ला विविध त्यांच्या आवडतीचे भोग म्हणजेच नेवेद्य दाखवले जातात व 9 दिवस विविध फुलांची माळ अर्पित केली जाते. त्यामुळे देवी माता खूप खुश होऊन आपल्या भक्तांची सर्व मनोकामना पुर्ण करते.
आता आपण पाहू या कोणत्या दिवशी कोणता भोग दाखवावा व कोणत्या फुलांची माळ अर्पित करायची.
पहिला दिवस शिरा, रबडी किंवा खवा वापरुन लाडू:
नवरात्रीचा पहिला दिवस देवीमाता शैलपुत्रि ला समर्पित आहे. पहिल्या दिवशी देवी माताला गाईचे तूप वापरुन हलवा, रबडी किंवा मावाचे लाडू अर्पित करू शकता. आपण पांढऱ्या फुलांची माळ किंवा गुलाबी रंगाची फुल म्हणजेच गुलाब किंवा चमेली
दूसरा दिवस साखर व पंचामृत:
नवरात्रीचा दूसरा दिवस माता ब्रह्मचारणीची पूजा केली जाते. ह्या दिवशी साखर (खडीसाखर) व पंचामृतचा भोग दाखवू शकता. हा भोग उपवासाला सुद्धा चालतो. कमळाचे फुल किंवा चमेली खूप आवडते.
तिसरा दिवस दूध वापरुन मिठाई:
नवरात्री तिसरा दिवस माता चंद्रघंटाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार माता चंद्रघंटाला दूध खूप आवडते. त्यामुळे दूध वापरुन आपण मिठाई किंवा खीर दाखवू शकता. जास्वंदीचे फुल अर्पित करणे विशेष महत्वाचे आहे.
चौथा दिवस मालपुवा:
नवरात्री चौथा दिवस माता कुषमांडाची पूजा केली जाते. माता कुषमांडाला मालपुवा खूप आवडतो. त्यामुळे मालपुवाचा भोग दाखवणे शुभ मानले जाते. सूर्यफूल किंवा झेंडूची फुले अर्पित करावी.
पाचवा दिवस फळे (सफरचंद,केळे):
नवरात्री पाचवा दिवस स्कंदमाताची पूजा केली जाते. ह्या दिवशी देवी माताला फळांचा नेवेद्य दाखवतात. म्हणजे सफरचंद किंवा केळी किंवा अजून काही फळ. गुलाबाची फुल किंवा झेंडूची फुल अर्पित करतात. त्यामुळे सुख समृद्धी मिळते.
सहावा दिवस गोड पान म्हणजेच मीठा पान:
शारदीय नवरात्री सहावा दिवस ऋषि पुत्रि माता कात्यायनीची पूजा केली जाते. ह्या दिवशी मिठाई बरोबर भोपळा, मध्य किंवा मिठे पान चा भोग अर्पित करतात. जास्वंदीचे फुल अर्पित केल्याने कृपा प्राप्त होते.
सातवा दिवस गुळ वापरुन प्रसाद:
नवरात्री सातवा दिवस माता कलरात्रीची पूजा केली जाते. माता कलरात्री ही दुष्टाचा विनाश ह्या रूपानि ओळखली जाते. नवरात्री मध्ये सातव्या दिवशी गुळ वापरुन भोग दाखवला जातो. निलकमळ किंवा चमेलीची फुल अर्पित केल्याने भीती व कष्टा पासून मुक्ती मिळते.
आठवा दिवस नारळाचा भोग:
नवरात्री आठवा दिवस माता महागौरीची पूजा केली जाते. आठव्या दिवशी नारळ किंवा नारळ वापरुन मिठाई किंवा लाडू चा भोग दाखवतात. पांढऱ्या रंगाची फुल प्रिय आहेत. त्यामुळे आशीर्वाद मिळतो.