शारदीय नवरात्री 2024 महाअष्टमी व महानवमी एकाच दिवशी आहे, पूजाविधी, कन्या पूजन कधी?
Shardiya Navratri 2024 Maha Ashtami And Mahanavami Puja Vidhi Kanya Pujan In Marathi
हिंदू धर्मामध्ये नवरात्री ह्या सणाला खूप पवित्र मानले जाते. जर अगदी स्वच्छ मनानी आपण माताची पूजा अर्चा केली तर भक्तांच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील. ह्या वर्षी अष्टमी व नवमी तिथी च्या बद्दल खूप गोंधळ आहे की अष्टमी व नवमी तिथी कधी आहे.
3 ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू झाली आहे. असे म्हणतात की ह्या नऊ दिवसांत माता दुर्गाचे आगमन होते व ती आपल्या भक्तांना काष्टा पासून मुक्ती देते. त्यामध्येच अष्टमी व नवमी ह्या तिथीला विशेष महत्व आहे. चला तर मग आपण पाहू या अष्टमी व नवमी हे व्रत कोणत्या दिवशी करायचे व पूजा विधी अगदी सोप्या पद्धतीने कशी आहे.
अष्टमी व नवमी तिथी कधी आहे? (Ashtami And Navami Date 2024)
पंचांग नुसार ह्या वर्षी शारदीय नवरात्रीमध्ये चतुर्थी तिथीमध्ये वाढ झाली आहे तर नवमी तिथीमध्ये वेळ कमी झाला आहे. पंचांग नुसार सप्तमी व अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर ला आहे. शास्त्रा नुसार सप्तमी व अष्टमी व्रत एकाच दिवशी आल्याने ते शुभ मानले जात नाही. महाअष्टमी व महानवमी ह्या दोन्ही तिथी 11 ऑक्टोबर साजरी करायची आहे.
महाअष्टमी व महानवमी तिथी:
अष्टमी तिथी 10 ऑक्टोबर दुपारी 12:31 मिनिट आरंभ होऊन 11 ऑक्टोबर दुपारी 12:06 मिनिट समाप्ती
नवमी तिथी 11 ऑक्टोबर दुपारी 12:06 मिनिट पासून प्रारंभ होत असून 12 ऑक्टोबर सकाळी 10: 58 मिनिट समाप्त होत आहे.
महाअष्टमी व महानवमी पूजाविधी:
महाअष्टमी व महानवमी 11 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून देवघरात गंगाजल शिंपडून घ्या, मग माता राणीच्या समोर दिवा लाऊन माता दुर्गाला गंगा जलनी अभिषेक करा. पूजा करताना माता राणी ला अक्षता, हळद-कुंकू, फुल व प्रसाद अर्पित करा. प्रसादात खीर, पुरी, चणे अर्पित करा. मग धूप दिवा लावल्यावर दुर्गा चालीसा का पाठ करा शेवटी परिवारातील सर्व सदस्यांनी माताची आरती म्हणावी.
नवरात्री अष्टमी ह्या तिथीचे महत्व:
नवरात्रीमध्ये अष्टमी ह्या तिथीला खूप महत्व आहे. ह्या दिवशी माता आदिशक्तीचे आठवे रुप महागौरीची पूजा केली जाते. तसेच ह्या तिथीला होम करतात ह्या तिथीला कल्याणकारी, यश, कीर्ती व समृद्धी देणारी तिथी म्हणतात. नवरात्री मध्ये दुर्गा माताची मनोभावे पूजा केल्याने सर्व कष्ट नष्ट होतात. शत्रूचा नाश होऊन विजय प्राप्त होतो. तसेच अष्टमी ह्या तिथीला शस्त्र पूजा करतात. ज्योतिष शस्त्र नुसार ह्या तिथीला कोणते सुद्धा चांगले कार्य केले तर ते पुर्ण होते. तसेक ही तिथी शाररीक व्याधी नष्ट करते.
नवरात्रि मध्ये नवमी तिथि कन्या पूजन महत्व:
नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे नवमी ह्या तिथीला सिद्धी प्रदान करणारी माता सिद्धिदात्रीची पूजा करतात. अष्टमी तिथी बरोबरच नवमी तिथीला सुद्धा महत्व आहे. ह्या दिवशी नऊ देवीची रूप असणारे प्रतीक म्हणजे नऊ कन्या ह्याची पूजा करतात. ह्या दिवशी नऊ कन्या घरी आमंत्रित करून त्यांची पूजा करतात. त्याच बरोबर एका बालक सुद्धा आमंत्रण देतात. त्याला बटुक भैरव किंवा लांगूर चे रूप मानतात. कन्या पूजनच्या बरोबरच माता दुर्गाला सुद्धा विदा करतात. मग नवरात्रीची समाप्ती होते.
कन्या पूजन विधि:
कन्या पूजन करण्याच्या आधल्या दिवशीच कन्याना आमंत्रण दिले पाहिजे.
शास्त्रों नुसार दो वर्ष पासून 10 वर्ष पर्यन्तच्या कन्याना पूजनासाठी आमंत्रण करायचे.
सर्वप्रथम शुद्ध पाणी घेऊन सर्व कन्या व एक बालक हीचे पाय दुवावे.
मग सर्वाना आसन वर बसण्यास आमंत्रण करावे.
आसनवर बसल्यावर दिवा लाऊन त्यांना कुकु लावावे.
मग खीर-पुरी हलवा व अजून काय पदार्थ बनवले असतील ते माता देवीला नेवेद्य दाखऊन मग सर्व कन्याना व बालक हयाना जेवण वाढावे व प्रमाने त्यांना जेवण सेवन करण्यास आग्रह करावा.
मग सर्वांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावा.
मग त्यांना प्रसाद, फळ व भेट वस्तु देवून विदा करावे
कन्या पुजनाची काही विशिष्ट महत्व:
कन्या पूजनच्या दिवशी 9 पेक्षा जास्त मुलींना आमंत्रित करणे जास्त शुभ असते.
2 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे जास्त शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे घरातील दरिद्र दूर होऊन सर्व बाधा पासून मुक्ती मिळते.
3 वर्षाच्या कन्या म्हणजे त्रिमूर्तिचे रूप मानले जाते. असे म्हणतात की 3 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते.
4 असे म्हणतात की सुख समृद्धीसाठी 4 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते.
5 वर्षाच्या मुलीना रोहिणी असे म्हणतात त्याची पूजा केल्यास सर्व रोगा पासून मुक्ती मिळते.
6 वर्षाच्या मुलीना कालिकाचे रूप मानले जाते असे म्हणतात की त्यांची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
7 वर्षाच्या मुलीना चंडिका असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरात ध्यान दौलतची कधी सुद्धा कमतरता होत नाही.
8 वर्षाच्या मुलींना शांभवी असे म्हणतात असे म्हणतात की 8 वर्षाच्या मुलींची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
9 वर्षाच्या कन्याना माता दुर्गाचे रूप मानले जाते. त्यांचे पूजन केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो.
10 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.