नवरात्री 2024 9 दिवस 9 रुप व 9 रंग, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले तर देवीमता प्रसन्न होईल
Significance Of 9 Avatars And 9 Colours For Navratri 2024 In Marathi
नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 रुप व 9 रंग परिधान करण्याचे विशेष महत्व आहे. नवरात्रीमध्ये प्रतेक रंग देवी माताच्या एक विशेष रूपाशी जोडला गेलेला आहे व त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. चला तर आपण पाहू या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्यास देवी माता प्रसन्न होईल.
आपण नवरात्रीमध्ये बरेच लोक आपल्या घराच्या दरवाजावर किंवा देवळामध्ये किंवा गाड्यांवर 9 दिवस 9 रंगाचे पताका म्हणजेच झेंडे लावतात ते सुंदरता व आकर्षकता वाढवण्यासाठी किंवा एक फॅशन म्हणून लावत नसून त्यामागे धार्मिक व ज्योतिष शास्त्राचे महत्व आहे.
नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रुपांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. 9 दिवस 9 रंगाचे विविध कपडे परिधान करून पूजा अर्चा केली तर देवी माता प्रसन्न होते.
नवरात्रि 9 दिवस, मताची 9 रुप व 9 रंग कोणते?
नवरात्रीमध्ये रंगाचे खूप महत्व आहे. कारणकी हे रंग भक्तांना देवी माताच्या विविध रूपांशी जोडले जातात. प्रतेक रंग हा देवी माताचे विशेष रूप आहे व भक्तांना त्या रंगाचे गुण प्राप्त होण्यास प्रेरित करतात. तसेच प्रतेक रंगाचे आपले एक वैशिष्ट आहे व त्याचे महत्व सुद्धा आहे. असे म्हणतात की हे रंग परिधान केलेतर देवी मताची कृपा प्राप्त होते व जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. नवरात्री मध्ये 9 दिवस 9 रुपांची पूजा करण्याचे महत्व आहे.
पहिला दिवस: 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार:
नवरात्री मध्ये पहिल्या दिवशी माता दुर्गाचे पहिले रूप माता शैलपुत्रिची पूजा करतात. 3 ऑक्टोबर गुरुवार ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र धरण करून देवी मताची पूजा केल्याने लाभ होतो. पिवळा रंग आशा व प्रसन्नताचे प्रतीक आहे.
दूसरा दिवश 4 ऑक्टोबर 2024 शुक्रवार:
4 ऑक्टोबर शुक्रवार ह्या दिवशी देवी माताचे दिव्य रूप माता ब्रह्मचारिणीची पूजा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून करा. हिरवा रंग प्रकृतीचे प्रतीक आहे व विकास, शांती व स्थिरताची भावना उत्पन्न करतो. असे म्हणतात की शुक्रवार ह्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून देवी माताची पूजा केल्याने जीवनात नविन शुभ सुरुवार करू शकता.
तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024 शनिवार:
नवरात्री मध्ये तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 5 ऑक्टोबर माता राणीचे तिसरे रूप माता चंद्रघंटाची आराधना स्लेट रंगाचे म्हणजे करड्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने व्यक्ति व्यवहारी बनतो व त्याचा स्वभाव सुद्धा सरल व सध्या होतो.
चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024 रविवार:
रविवार चौथा दिवस ह्या दिवशी दुर्गा माताचे चौथे रूप माता कुष्माण्डाची पूजा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून केल्याने जीवनात स्फूर्ति व उल्हास वाढतो. त्याच बरोबर आत्मविश्वास व मनोबल वाढण्यास मदत होते.
पाचवा दिवस 7 ऑक्टोबर 2024 सोमवार:
सोमवार 7 ऑक्टोबर ह्या दिवशी देवी मताची कृपा मिळण्यासाठी त्यांचे पंचम दिव्य रूप स्कंदमाताची आराधना पांढरे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते त्यामुळे आपले मन शांते बनते.
सहावा दिवस 8 ऑक्टोबर 2024 मंगळवार:
मंगळवार 8 ऑक्टोबर देवीमाताचे सहावे रूप माता कात्यायिनी ची पूजा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून माताला लाल रंगाची ओढणी अर्पित करा. त्यामुळे जीवनात नविन शक्ति व साहसचा संचार होतो.
सातवा दिवस 9 ऑक्टोबर 2024 बुधवार:
नवरात्री मधील सातवा दिवस बुधवार 9 ऑक्टोबर माता राणीचे सातवे रूप माता कालरात्री ची पूजा गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केल्यानि व्यक्तिला अतुलनीय आनंदाची अनुभूति होते. त्यामुळे जीवनात समृद्धी च्या बरोबर शांती सुद्धा मिळते.
आठवा दिवस 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार:
गुरुवारी 10 ऑक्टोबर गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून देवी माताचे आठवे रूप माता महागौरीची पूजा केल्यास व्यक्तित्व मध्ये आकर्षण निर्माण होते. व तसेच घरात सुख समृद्धीमध्ये वृद्धी होते.
नववा दिवस 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार:
नवरात्री मध्ये नवव्या दिवसाचे नववे रूप माता सिद्धिदात्री ची आराधना जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास जीवनात भव्यता व राजसी थाट बाटमध्ये वाढ होते.
आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या रंगांचा आपल्या मनावर चांगला प्रभाव होतो. हे विभिन्न रंग आपल्या मनावर वेगवेगळी प्रभाव टाकतात. उदाहरण अर्थ लाल रंग उत्साह व ऊर्जा वाढवतो. तर निळा रंग शांत भावनांची सूचना देतो. नवरात्रीमध्ये विविध रंग परिधान करून मनावर सकारात्मक प्रभाव पडतो व अधिक उत्साहित व ऊर्जा प्राप्त होते.