स्मार्ट टिप्स: दिवाळी फराळ करायच्या अगोदर अशी तयारी करा झटपट स्वादिष्ट फराळ तयार होईल
Smart Amazing Tips For Diwali Dipawali Faral Preparation In Marathi
||शुभ दीपावली ||
दिवाळी किंवा दीपावली हा वर्षातील सर्वात महत्वाचा व आनंदाचा सण आहे. दिवाळी सण हा सणांचा राजा आहे. भारतात प्रतेक प्रांतात दिवाळी हा सण अगदी धूम धडाक्यात साजरा केला जातो.
दसरा झाला की महिला आपले घरात छान साफ करून सजवतात म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी माता प्रसन्न होईल. कारणकी लक्ष्मी मताला स्वछता अतिप्रिय आहे.
दिवाळीच्या वेळी महाराष्ट्रात नानाविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. आपण फराळा मध्ये लाडू, चिवडा, चकली, शेव, शंकरपाळी अनारसे बनवतो. तसेच हे सर्व फराळाचे पदार्थ आपण फक्त दिवाळीच्या वेळीच बनवतो. हे सर्व पदार्थ दिवाळीच्या वेळी बनवायचे तर त्यासाठी आपण अगोदरच थोडी तयारी करून ठेवली तर आपला फराळ झटपट व स्वादिष्ट बनतो.
दिवाली फराळाची तयारी अगोदरच कशी करायची त्याची माहिती आपण पाहू या.
दिवाळीच्या फराळाची तयारी आगोदरच करावी म्हणजे आयत्यावेळी काही गडबड होणार नाही. आपल्याला फराळाचे कोणते पदार्थ बनवायचे आहेत व त्यासाठी कोणकोणते जीनस लागणार आहेत ह्याची आगोदरच यादी करावी व त्याप्रमाणे जीनस आणून ठेवावेत.
1. वेलचीपूड: वेलदोडे आणून प्रथम तव्यावर थोडे गरम करून घेवून मग त्याची साल काढून साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मग पूड घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी व फराळ जेव्हा बनवायचा तेव्हा वेलचीपूड वापरावी म्हणजे त्याच्या सुवास तसाच राहील.
2. बेसन: चण्याची डाळ आणून त्याचे डोळे असतील तर काढावे मग चांगल्या कडकडीत उन्हात ठेवून मग चणाडाळ दळून आणून बेसन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा चनाडाळ दळून आणताना ती चनाडाळी वरच दळून आणावी म्हणजे आपला फराळ छान होतो.
3. करंजीचे सारण: नारळ खोवून करंजीचे सारण आधल्या दिवशीच बनवून ठेवावे. म्हणजे दुसऱ्या दिवशी करंजी झटपट होईल.
4. चकलीची भाजणी: चकलीची भाजणी बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी. म्हणजे चकली करताना त्याचा खमंग सुगंध तसाच राहील. (चकली चांगली कशी बनवावी व बिघडली तर काय करावे त्याच्या टिप्स दिलेल्या आहेत त्याच्या पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहाव्या.) टिप्स व ट्रिक्स चकली
5. चिवडा बनवण्यासाठी: चिवडा करण्यासाठी शेंगदाणे भाजून साले काढून ठेवावीत. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवावेत. चिवड्याचे डाळे निवडून ठेवावे. चिवड्याचा मसाला बनवून ठेवावा. पोहे आधल्या दिवशी कडक उन्हात ठेवावे म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होईल.
6. पिठीसाखर: लाडू बनवण्यासाठी साखर बारीक करून ठेवावी. जर बुरा शक्कर म्हणजेच बेसन लाडू साठी तगार वापरणार असाल तर तगार कसे बनवायचे त्याचा विडियो पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहा. तगार कसे बनवायचे
7. ड्राय फ्रुट: काजू-बदामचे पातळ काप करून ठेवावे. लाडू बनवण्यासाठी थोडे कुटून ठेवावेत.
8. अनारसा : अनारसे बनवण्यासाठी आगोदरच अनारस्याचे पीठ बनवून ठेवावे.
9. पोहे, रवा, मैदा, पिठीसाखर ताजी आणून वापरावी म्हणजे फराळ छान होतो.
10. दिवाळीच्या वेळेस पणत्या लावण्यासाठी आगोदरच पणत्या आणून ठेवाव्यात, वाती बनवून ठेवाव्यात. रांगोळी व रांगोळीचे रंग आणून ठेवावेत.
11. अभ्यंग स्नान करण्यासाठी सुंगधी उटणे, सुंगधी तेल, सुगंधी साबण आधीच आणून ठेवावा. आपल्याला सुगंधी उटणे घरी बनवायचे असेलतर सुगंधी उटणे घरी कसे बनवायचे ह्याची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता. : होम मेड सुगंधी उटणे
12. फराळ देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, रंगीत पेपर आणून ठेवावेत. आज काल फराळ देण्यासाठी छान बॉक्स सुद्धा मिळतात.
13. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी आधीच दिवे आणून ठेवावेत. तसेच धने, गुळ, पण आणून ठेवावे.
14. लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी देवीचा फोटो अथवा प्रतिमा आणावी, साळीच्या लाह्या, बत्तासे, फुले, लक्ष्मीची पावले, पूजेचे सामान तयार ठेवावे.
15. जर कोणाला काही भेटवस्तू द्यायची असेल तर आणून ठेवावी. ही दिवाळीची तयारी आगोदरच करून ठेवावी. म्हणजे आईन वेळी गडबड होणार नाही व आपली दिवाळी सुखाची भरभराटीची जाईल.
दिवाळी फराळासाठी नानाविध फराळाचे पदार्थ व मिठाई कशी बनवायची ह्याची लिंक पुढे देलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता. : दिवाळी फराळ व मिठाई