टिप्स अँड ट्रिक्स: परफेक्ट झटपट क्रिस्पी शंकरपाळी कशी बनवायची नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यासाठी
Tips And Tricks For Perfect Tasty Crispy Diwali Faral Shankarpali For Beginners In Marathi
आता दिवाळी जवळच आली आहे. प्रतेक महिलांची गडबड सुरू आहे फराळ बनवण्यासाठी मग वेगवेगळे विडियो चॅनल किंवा वेबसाइट पाहून फराळाचे पदार्थ पहिले जातात. पण बऱ्याच जणांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. शंकरपाळी बनवताना योग्य त्या टिप्स आपण लक्षात घेतल्या तर मस्त खुसखशीत अगदी बिस्किटस् सारख्या शंकरपाळ्या तयार होतील.
आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये दिवाळी फराळ तयारी कशी करायची ह्याची माहिती प्रकाशित केली आहे त्यामुळे आपला दिवाळी फराळ अगदी सहज व छान काही गडबड न होता तयार होईल. त्याची लिंक दिलेली आहे: दिवाळी फराळ तयारी कशी करायची
आपण दिवाळी फराळमध्ये लाडू, करंजी, चिवडा, शेव, चकली शंकरपाळी बनवतो. त्याचे असंख्य प्रकार आमच्या Royal Chef Sujata ह्या साईटवर पाहायला मिळतील.
आज आपण टिप्स फॉर शंकरपाळी किंवा शंकरपाळे ह्या बद्दल माहिती घेणार आहोत.
गोडाची शंकरपाळी बनवताना घ्यावयाची काळजी:
गोड शंकरपाळी बनवताना साखरेचे प्रमाण योग्य म्हणजे जसे रेसीपीमध्ये दिले असेल त्याप्रमाणे घ्या. जर साखरेचे प्रमाण जास्त झाले तर शंकरपाळ्या कडक होतात. छान खुसखुशीत होत नाहीत.
आपण तेल, पाणी व साखर मिश्रण गरम करून शंकरपाळी बनवतो तेव्हा मिश्रण गरम असताना मैदा मिक्स करू नये त्यामुळे शंकरपाळी तळताना तेल किंवा तूप जास्त शोषले जाते व शंकरपाळी तेलकट होते.
आपण मैदा वापरुन शंकरपाळी बनवतो तेव्हा त्यामध्ये थोडा बारीक रवा वापरुन पीठ भिजवावे व 10 मिनिट बाजूला झाकून ठेवावे म्हणजे रवा थोडा भिजतो व त्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात.
शंकरपाळीचे पीठ भिजवताना थोडेसे मीठ घाला छान चव लागते. गोड पदार्थमध्ये एक चिमूत मीठ घातले तर टेस्ट छान येते.
शंकरपाळी बनवताना गोळा घेऊन थोडे जाडसर लाटावे म्हणजे छान होतात.
शंकरपाळी तळताना तेल अथवा वनस्पति तूप वापरले तरी चालते.
शंकरपाळी तळताना मंद विस्तवावर तळावी खूप काळी तळली तर करपट लागतात. तसेच पांढरट तळली तर पोटात कच्ची राहतात व मऊ पडतात.
शंकरपाळी तळताना छान गुलाबी रंगावर तळावी तसेच सुरवातीला शंकरपाळी तेलात किंवा तुपात टाकताना ते नीट तापले आहे की नाही ते तपासून पहावे. मगच तळायला घ्यावी. त्यामुळे छान खुसखुशीत होतात व 10-15 दिवस चांगल्या टिकतात.
पाकातील शंकरपाळी बनवताना अश्या प्रकारे काळजी घ्या.
पाकातल्या शंकरपाळी लाटताना थोडी जाडसर लाटावी व तळताना मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळावी. अश्या प्रकारची शंकरपाळी छान लागते लग्नात किंवा इतर वेळी बनवतात.
पाकातील शंकरपाळी बनवताना पाक गोळी बंद करवा. मग शंकरपाळी तळून झाल्यावर पाकात व्यावस्तीत घोळावी. थंड झाल्यावर डब्यात भरावी.
खारी शंकरपाळी:
खारी शंकरपाळी बनवताना ती पातळ लाटावी चवीला छान लागते व प्रवासाला जाताना बरोबर नेता येते.