3 सटीक मंत्र स्विच वर्ड करतील आपल्याला परीक्षेमध्ये उतीर्ण व टॉपर कसे
3 Mantras Switch Words for Success And Topper In Examination In Marathi
स्विच वर्ड हे आता दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत चालले आहेत. बहुतेक ज्योतिषी, वाचक, अंकशास्त्र स्विच वर्ड वापरण्यास तयार असत्तात. स्विच वर्ड असा एक शब्द आहे त्याच्या मुळे आपले मन स्थिर बनते, एकाग्रता वाढते, आपल्या मनात सकारात्मक विचार येतात.
स्विच वर्ड म्हणजे नक्की काय
स्विच वर्ड हा असा एक शब्द आहे की रोज सारखा सारखा त्याचा उचार केला तर आपली मानसिक ऊर्जा सक्रिय होते त्याचे अनेक फायदे होतात.
स्विचवर्ड आपली ऊर्जा एका बाजूनी दुसऱ्या बाजुमद्धे बदलू शकते.
स्विच वर्ड हा आकर्षणाचे काम करतो.
स्विच वर्ड आपले डोके शांत ठेवण्याचे काम करतो व कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो.
स्विच वर्डचा जाप केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते.
स्विच वर्डचा उपयोग आपल्या स्वास्था संबंधित मुद्दे, आपली नाती, व धन पैसा मिळण्यासाठी मदत होते.
आज आपण असे 3 स्विच वर्ड बघणार आहोत की त्याचा जाप केल्यास आपले मन शांत होऊन, अभ्यासात प्रगती होऊन, परीक्षेमद्धे चांगले मार्क्स येतात, आपण शाळेत असाल किंवा कॉलेजमध्ये असाल किंवा कोणत्या सुद्धा स्पर्धा परीक्षा बसला असालतर ह्या स्विच वर्डचा जाप करून आपण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता.
पहिला स्विच वर्ड “एम” किंवा “एं”
“एं” हा स्विच वर्ड सरस्वती माताचा आहे. आपले जर अभ्यासात मन लागत नाही, वाचलेले लक्षात रहात नाही, किंवा परीक्षेच्या वेळ विसरायला होते तर “एं” ह्या स्विच वर्डचा सकाळी 5 मिनिट व संध्याकाळी 5 मिनिट जाप करावा. त्यामुळे आपले मन एकाग्र होऊन अभ्यासात प्रगती होईल व परीक्षेच्या वेळी आपण अभ्यास केलेल्या आठवेल व परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील.
दूसरा स्विच वर्ड आहे ” Reach First Rank Divine”
“रिच फर्स्ट रॅंक डिव्हाईन” हा अजून एक स्विच वर्ड आहे जो आपल्याला प्रतेक परीक्षेमध्ये चांगल्या मार्क्सनी उतीर्ण करू शकेल. त्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोण ठेवून रोज दर दोन तासांनी ह्या स्विच वर्ड चा 21 वेळा जाप करा. जाप करण्याच्या अगोदर असे मानत आणा की आपण परीक्षेमध्ये टॉपर आहोत आपल्याला सर्वात जास्त मार्क्स मिळाले आहेत असे सारखे मानत आणून जाप केला तर नक्कीच आपल्याला यश येईल.
तिसरा स्विच वर्ड आहे ” Reach Gold Medal Divine”
“रिच गोल्ड मेडल डिव्हाईन” ह्या स्विच वर्डचा जाप करतांना आपल्या मनात सतत विचार आणला पाहिजे की मला सर्वात जास्त मार्क्स मिळणार व गोल्ड मेडल मिळणार म्हणजेच आपण सकारात्मक विचार करून मंत्र जाप करवा.
आपल्याला एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर लाल किंवा हिरव्या रंगाच्या शाईच्या पेनानी एक मोठा गोल काढायचा आहे. मग त्यामध्ये मधोमध एक छोटासा गोल काढायचा आहे. त्या छोट्या गोलाच्या खाल्ली आपल्याला “एं” हा शब्द लिहायचा आहे त्याच्या खाली आपल्याला “रिच फर्स्ट रॅंक डिव्हाईन” हे लिहायचे आहे मग त्याच्या खाली आपल्याला “रिच गोल्ड मेडल डिव्हाईन” हा स्विच वर्ड लिहायचा आहे. मग हा कागद आपण झोपतो त्या उशीच्या खाली ठेवायचा आहे. किंवा आपण जेथे अभ्यास करतो त्या जागी ठेवायचा आहे.
असे केल्याने आपले मन एकाग्र होईल व अभ्यासात प्रगती होऊन चांगले मार्क्स येतील, आपण टॉपर बनाल व आपल्याला गोल्ड मेडल सुद्धा मिळू शकेल फक्त त्यासाठी आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवा.