ज्योतिष शास्त्रा नुसार पायात काळा दोरा बांधण्याचे फायदे, काळा दोरा कधी, कोणी व कोणत्या पायात बांधवा
Astrology Benefits Of Wearing Black Thread On The Foot In Marathi
* काळा दोरा शनि देवाचे प्रतीक मानले जाते.
* पायात काळा दोरा बांधण्याने शनिदेवाची कृपा मिळते.
* शनि दोष पासून मुक्ती मिळून नकारात्मक शक्ति दूर होऊन वाईट नजर लागत नाही.
* पायात काळा दोरा बांधल्याने आर्थिक तंगी दूर होते.
* व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
* घरात सुख-समृद्धी येते.
* ज्या मुलांना सारखी सारखी नजर लागते त्यांच्या पायात काळा दोरा बांधला पाहिजे. त्यांना नकारात्मक ऊर्जा पासून वाचवता येते.
* कुंडली मधील राहू-केतू ग्रह जर कमजोर असतील तर पायात काळा दोरा बंधावा.
लोक बरेचवेळा वाईट नजर पासून वाचण्यासाठी पायात काळा दोरा बांधतात, तर काही लोक केवळ एक फॅशन म्हणून सुद्धा पायात काळा दोरा बांधतात.
पण आपल्याला माहिती आहे का काळा दोरा पायात बांधण्याचे काही नियम आहेत. जर आपण त्या नियमांचे पालन केले तर शनि देवाचा प्रकोप होण्या पासून आपण वाचू शकता.
पायात काळा धागा बांधण्याचा लाभ:
शनि ग्रहशी संबंधित:
वैदिक ज्योतिष शास्त्रा नुसार काळा धागा हा शनि ग्रहशी संबंधित आहे. असे म्हणतात की पायात काळा धागा बांधल्याने शनिदेव आपले रक्षण करतात. आपल्या घरात सुख-समृद्धी आणतात.
पैशाची तंगी दूर होते:
पायातील अंगठ्यामध्ये काळा धागा बांधणे अधिक चांगले मानले जाते. त्यामुळे आपले स्वास्थ चांगले राहते. तसेच राहू केतू ह्या ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होईल. त्यामुळे पैशांची चणचण सुद्धा दूर होईल.
ज्योतिष शास्त्रा नुसार मेष व वृश्चिक राशि असणाऱ्यांनी काळा धागा बांधू नये. कारणकी ह्या दोन्ही राशीचे स्वामी मंगळ देव आहेत. ज्यांचा रंग लाल आहे. असे म्हणतात की मंगळ ह्या ग्रहाचा काळ्या रंगाशी वैर आहे. म्हणून ह्या राशीच्या लोकांनी काळा धागा बांधण्याच्या दुष्परिणामा पासून वाचले पाहिजे.
काळा धागा कधी केव्हा व कोणी बांधावा:
शास्त्रा नुसार मंगळवारी पायात काळा दोरा बांधल्याने शनि देवाची कृपा मिळेल.
काळा धागा बांधताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
* बाजारातून काळा धागा आणण्याच्या आयवजी भैरव नाथ मंदिरातून धागा आणून बांधणे जास्त फायदेशीर आहे.
* ज्योतिष शास्त्रा नुसार काळ्या धागाला चारी बाजूनी गाठी मारून मग घाला.
* एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण काळा धागा बांधतो तेव्हा दूसरा कोणत्या सुद्धा रंगाचा धागा बांधू नये.
* शनि देवांची कृपा मिळण्यासाठी काळा धागा शनिवार किंवा मंगळवार ह्यादिवशी बांधणे लाभदायक आहे.
* धागा बांधताना गायत्री मंत्र म्हणा पण महिलांनी महणू नये.
* काळा धागा पायात बांधताना महिलानी डाव्या पायात बांधवा व पुरुषांनी उजव्या पायात बांधवा