Fruit Cake Wheat Flour Cake No Egg, No Maida, No Sugar, No Butter In Pan For Kids In Marathi
फ्रूट केक बिना मैदा, साखर, अंडे, बटर, ओव्हन गव्हाचे पीठ व गूळ वापरुन केक मुलांसाठी
केक हा पदार्थ लहान असो किंवा मोठे सर्वांना खूप आवडतो. आपण वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा डेझर्ट म्हणून केक बनवू शकतो.
The Fruit Cake Wheat Flour Cake No Egg, No Maida, No Sugar, No Butter In Pan For Kids In Marathi can be seen on our You tube Chanel Fruit Cake Wheat Flour Cake
आज आपण फ्रूट केक अगदी हेल्दी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. फ्रूट केक बनवताना आपण संत्र्याचा ज्यूस वापरणार आहोत तसेच बिना अंडे, बिना बटर, बिना मैदा व बिना साखर बनवणार आहोत. तसेच आपण ओव्हनसुद्धा वापरणार नाही. तर गव्हाचे पीठ व गूळ वापरणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेकिंग वेळ: ३५-४० मिनिट
साहित्य:
१ १/४ कप गव्हाचे पीठ
१/२ कप गूळ
१ टे स्पून कोको पावडर
१/४ कप संत्र्याचा ज्यूस
१/४ कप तेल
१/२ कप दूध
१ टी स्पून बेकिंग पाऊडर
१/४ टी स्पून बेकिंग सोडा
६-७ काजू
६-७ बदाम
२ टे स्पून किसमिस
१/४ वाटी टुटी फ्रूटी
५-६ खजूर (चिरून)
कृती: प्रथम संत्र्याचा ज्यूस काढून घ्या,. ड्राय फ्रुट्स चिरून घ्या,. गव्हाचे पीठ, कोको पावडर, बेकिंग पाऊडर, बेकिंग सोडा मिक्स करून चालून घेऊन बाजूला ठेवा. गूळ चिरून घ्या. केकच्या भांड्याला बटर किंवा तेल लावून घ्या. पॅन गरम करायला ठेवा, त्यामध्ये मीठ घालून एक स्टँड ठेवा.
एका बाउल मध्ये संत्र्याचा ज्यूस, तेल व दूध मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये चिरलेला गूळ किंवा गूळ पावडर घालून मिक्स करून घ्या, गूळ पूर्ण विरघळला पाहिजे. मग त्यामध्ये फ्रूट एसेन्स घालून मिक्स करा.
आता त्यामध्ये चाळलेले गव्हाचे पीठ घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या, मिश्रण खूपच घट्ट वाटले तर त्यामध्ये अजून १ टे स्पून दूध मिक्स करू शकता. मग त्यामध्ये चिरलेले ड्राय फ्रुट्स घाला थोडेसे ड्राय फ्रुट्स बाजूला केकला सजवण्यासाठी. ड्राय फ्रुट्स मिक्स केल्यावर मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एक सारखे करून ड्राय फ्रूटने सजवा.
आता केकचे भांडे पॅनमध्ये ठेवून झाकण ठेवा. मग ३५-४० मिनिट केक बेक करून घ्या. थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.