ड्रैगन फ्रूट सेवनाचे आरोग्यदायी अनगिनत फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा आहे
Health Benefits Of Dragon Fruit & Nutrition In Marathi
आजकाल आपण ड्रगन फ्रूटचे नाव सतत आईकत आहोत. उपीमध्ये एका कॉपुटर इंजिनियर शहरातील चांगली नोकरी सोडून बंजर जमिनीवर ड्रैगन फ्रूटची शेती चालू केली.
आपल्याला माहिती आहे का ड्रैगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप सेहतमंद आहे. आपली तबेत खराब झालीतर आपण लाखों रुपये खर्च करतो. तसेच आपण रोजच्या जीवनात खाण्या पिण्यावर सुद्धा बराच खर्च करतो. त्यापेक्षा चांगले खाणे पिणे ठेवा फळे खा जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. फळे सेवन करताना चांगली फळे सेवन करा जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. ड्रैगन फ्रूट हे एक चांगले फळ आहे.
ड्रैगन फ़्रूट सेवनाचे फायदे व नुकसान:
ड्रैगन फ़्रूट मध्ये फायबर आहे जे ब्लड शुगरला नियंत्रित करते. ज्या लोकांना डायबीटीस आहे त्यांच्या साठी फायदेमंद आहे.
ड्रैगन फ़्रूट मध्ये विटामीन सी आहे त्यामुळे इम्यूनिटी वाढण्यास मदत होते.
ड्रैगन फ़्रूट मध्ये बीटालेंस आहे जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
ड्रैगन फ़्रूट मध्ये विटामिन ए आहे त्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
ड्रैगन फ़्रूट मध्ये फ़ोलेट आहे त्यामुळे गर्भावस्था मध्ये अभ्रकाच्या विकासासाठी जरुरीचे आहे.
ड्रैगन फ़्रूटमध्ये कैल्शियम, मैग्नीशियम, व फ़ॉस्फ़ोरस आहे जे हाडांना मजबुत ठेवते.
ड्रैगन फ़्रूटला थंड फळ असे मानले जाते.
ड्रैगन फ़्रूट ला कापल्या कापल्या लगेच खाल्ले पाहिजे.
ड्रैगन फ़्रूटच्या बाहेरील भाग फेकून द्यावा कारण की त्यामध्ये किटकनाशक असतात.
ड्रैगन फ्रूट मध्ये विटामिन C भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे सेलुलर इम्यूनिटीमध्ये सुधारणा होते. व डेंगुंच्या तापा पासून सुरक्षितता मिळते.
रोज ड्रैगन फ्रूट सेवन केल्याने तसे काही नुकसान होत नाही तरीपण एकदा डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आपण ड्रैगन फ्रूटचे सेवनाचे फायदे पहिले अजून त्याचे काही फायदे आहेत जे गंभीर रोगावर फायदेमंद आहेत.
ड्रैगन फ्रूट मध्ये विटामिन सी व अजून काही एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आहेत. जे इम्युन सिस्टिमसाठी चांगले मानले जाते. ते आपल्या शरीरातील आयर्नचा स्तर वाढवते.
हेल्दी हार्टसाठी सेवन करा ड्रैगन फ्रूट:
हार्ट संबंधित आजार आपल्या शरीराला दुसऱ्या रोगासाठी सुद्धा डोके दुखी होऊ शकते. त्याच्या साठी ड्रैगन फ्रूट हे हार्टसाठी हेल्दी फ्रूट मानले जाते. ह्या फळातील बियांमद्धे ओमेगा-3 व ओमेगा-9 फैटी एसिड आहे. जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.
कैंसर झालेल्या रोगीसाठी फायदेशीर आहे ड्रैगन फ्रूट:
ड्रैगन फ्रूट मध्ये एंटीट्यूमर, एंटीऑक्सीडेंट व एंटी इंफ्लेमेटरी गुण आहेत. जे महिलांना ब्रेस्ट कैंसर होण्या पासून वाचवण्यास मदत करते. तसेच ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांना सुद्धा हे फळ फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल ला कंट्रोल करते ड्रैगन फ्रूट:
ड्रैगन फ्रूटचे सेवन टोटल कोलेस्ट्रॉल ट्राइग्लिसराइड व खराब LDL लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलला कमी करते. जी सर्वाधिक स्ट्रोक व हार्ट संबंधित आजार होण्यास कारणीभूत आहे. ड्रैगन फ्रूट हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते.
सांधे दुखीवर उपयोगी ड्रैगन फ्रूट:
सांधेदुखी मध्ये सांधे दुखतात व सूज येते. ड्रैगन फ्रूट हे त्यावर अगदी रामबाण उपाय आहे. ड्रैगन फ्रूट मध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे सांधेदुखी पासून आराम मिळतो.
इम्यूनिटी बूस्टर आहे ड्रैगन फ्रूट:
ड्रैगन फ्रूट मधील विटामिन सी व कैरोटीनॉयड आपली प्रतिरक्षा प्रणाली वाढवण्यास मदत करते. ज्याने आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशीना साथीच्या रोगापासून रोग होण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
मेंदूचे कार्य नीट ठेवते ड्रैगन फ्रूट:
ऑक्सीडेटिव स्ट्रेस शारीरिक व मानसिक नुकसान करते. ज्याच्या मुळे ब्रेन डिसफंक्शन सारखे अल्जाइमर रोग, पार्किन्सन रोग व मिर्गी सारखे रोग होऊ शकतात. ह्या पासून आराम मिळण्यासाठी ड्रैगन फ्रूट हे फायदेशीर आहे.
ड्रैगन फ्रूटचे तोटे:
ड्रैगन फ्रूट जास्त सेवन केल्याने गॅसट्रोच्या सनस्या होऊ शकतात. काही जणांना ड्रैगन फ्रूट सेवन केल्याने सूज येणे, गॅस होणे अश्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
स्कीन वर खाज येवू शकते. साखरेचे प्रमाण थोडे जास्त आहे त्यामुळे वजन वाढू शकते.
डिस्क्लेमर: हा लेख फक्त आपल्या माहिती साठी देत आहोत. त्याची कोणती सुद्धा पुष्टी आम्ही घेत नाही. जास्तीच्या माहितीसाठी आपण डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता.