In 10 Miniutes Tasty Healthy Crispy Veg Cheese Besan Dosa For Kids Nashta Recipe In Marathi
10 मिनिटात टेस्टी क्रिस्पी हेल्दी वेज चीज बेसन डोसा मुलांच्या नाश्तासाठी
मुलांना भूक लागली की रोज प्रश्न पडतो काय बनवायचे ते सुद्धा हेल्दी व झटपट कसे होईल. तसेच मुलांना रोज काही तरी वेगळे खायला आवडते.
The In 10 Miniutes Tasty Healthy Crispy Veg Cheese Besan Dosa For Kids Nashta Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Healthy Crispy Veg Cheese Besan Dosa For Kids Nashta
आज आपण असाच एक झटपट व मस्त कुरकुरीत मुलांना आवडले असा पदार्थ बनवणार आहोत. तो सुद्धा अगदी पौष्टिक या मिनिटात संपेल असा. हा नवीन प्रकारचा नाश्ता बनवताना त्यामध्ये आपण बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, कोथिंबीर, गाजर, शिमला मिरची, वापरणार आहोत तसेच मुलांचे आवडीचे चीज सुद्धा वापरणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 डोस
साहित्य:
1 कप बेसन, 1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद, 1/4 टी स्पून हिंग
2 टे स्पून टोमॅटो केचप
1 चीज क्युब (किसून), मीठ चवीने
तेल डोस भाजण्यासाठी
सारणासाठी:
1 छोटासा कांदा (चिरून), 1 छोटासा टोमॅटो (चिरून)
1 छोटेसे गाजर(चिरून), 1 छोटीसी शिमला मिरची (चिरून)
1 हिरवी मिरची (बारीक चिरून) कोथिंबीर (चिरून)
कृती: एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ घालून मिक्स करून लागेल तसे पाणी वापरुन भजाच्या पिठासारखे मिश्रण बनवून बाजूला ठेवा. कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गाजर बारीक चिरून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा त्यावर थोडे तेल लावून एक मोठा डाव बेसन्चे मिश्रण घालून पसरवून घ्या, डोसा तोडा पातळच पाहिजे. मग त्यावर टोमॅटो केचप लावून थोडा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर घालून, किसलेले चीज घालून मंद विस्तवावर डोसा छान कुरकुरीत होऊ द्या, मग त्याला फोल्ड करून एक वळकुटि बनवा.
गरम गरम व्हेज चीज बेसन डोसा सर्व्ह करताना त्याचे 4-5 पिसेस कट करून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.