18 नोव्हेंबर सोमवार संकष्टी चतुर्थी आईने मुलांसाठी करा उपाय भाग्योदय, अभ्यासात प्रगती,नोकरी, विवाह, आर्थिक प्रगती होऊन संकट नष्ट होतील
Sankashti Chaturthi Upay For Children Study, Job and Marriage In Marathi
18 नोव्हेंबर सोमवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. 18 नोव्हेंबर ह्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिथी सुरू होत असून 19 नोव्हेंबर मंगळवार संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी समाप्त होत आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबर सोमवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थीला चंद्रोदय हा रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी होणार आहे.
चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम स्वच्छ स्नान करा पण स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल घालून स्नान करा त्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल. मग स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पाना जल अभिषेक घालून हळद-कुंकू, अक्षता वाहून दूर्वा अर्पित कराव्या त्याच बरोबर लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करावे. जास्वंदीचे फूल गणपती बाप्पाना अतिप्रिय आहे.
The Sankashti Chaturthi Upay For Children Study, Job and Marriage In Marathi can be seen on our You tube Chanel Sankashti Chaturthi Upay For Children
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करावी त्यामुळे आपल्या घरात सुख-शांती, नांदते, घरातील नाकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते. आपल्या मनोकामना पूर्ण होतात.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी प्रतेक आईने आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी, नोकरी मिळण्यासाठी, लवकर विवाह होण्यासाठी आपण काही उपाय केलेतर मुलांची अभ्यासात प्रगती होते, चांगली नोकरी प्राप्त होते, जर मुलांच्या विवाहात आडचणी येत असतील तर दूर होतील, मुले हट्टी असतील तर हट्टीपणा दूर होईल, मनोकामना पूर्ण होईल.
आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे.
चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी साधारण पणे 6 वाजता आपल्याला हा उपाय आपल्या मुलांच्यासाठी करायचा आहे.
जर मुले लहान असतील तर हा उपाय आईने स्वतः करावा व मुले मोठी असतील तर ते स्वतः हा उपाय करू शकतील.
आपल्याला एका वाटीत 108 हिरवे मुग घ्यायचे आहेत व एक छोटा हिरवा कपडा घ्यायचा आहे. जर दोन मुलांसाठी हा उपाय करीत असाल तर दोन वाटीत 108 हिरवे मुग व दोन हिरवे कापड घ्यायचे आहेत. तर वाटीत हिरवे मुग घेतल्यावर आपल्याला आपल्या घरातील देव्हाऱ्या समोर बसून गणपती बाप्पाच्या तुपाचा दिवा, अगरबत्ती लाऊन गणपती बाप्पाना हळद-कुंकू, अक्षता, दूर्वा, लाल फूल अर्पित करावे, गोड पदार्थाचा भोग ठेवावा.
मग हातात एक मुग घेऊन ॐ गं गणपतये नमः हा मंत्र म्हणून आपल्या मनातील मनोकामना बोलून मुग हिरव्या कापडावर ठेवावा असे आपल्याला 108 वेळा मंत्र म्हणून मनोकामना म्हणून मुग ठेवावा. 108 वेळा मंत्र म्हणून झाल्यावर हिरव्या कापडाची एक पुरचुंडी बांधावी, मग पुरचुंडी थोडा वेळ गणपती बाप्पा समोरच ठेवावी व रात्री उचलून मुले जेथे झोपतात तेथे त्याच्या उशीच्या खाली ठेवावी. असे केल्याने मुलांची प्रगती होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतील. हा उपाय आपण संपूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने करावा.