Spicy Masoor Dal Tadka Winter Season Special Punjabi Dhaba Style Recipe In Marathi
थंडीच्या सीझनमध्ये गरमागरम झणझणीत मसूर डाळ तडका पंजाबी ढाबा स्टाइल
आता थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे गरमागरम मसुरच्या डाळीचा डाळ तडका बनवा मस्त टेस्टि लागतो. डाळ तडका बनवताना मसुर डाळ वापरली आहे पाहिजे तर आपण तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता.
The Spicy Masoor Dal Tadka Winter Season Special Punjabi Dhaba Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Spicy Masoor Dal Tadka Winter Season Special Punjabi Dhaba Style
मसुरच्या डाळीचा तडका आपण पंजाबी ढाबा स्टाइल बनवणार आहोत. पान जिरा राईस किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकता.
साहित्य:
१ वाटी मसुर डाळ
१ टे स्पून तेल
१ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१ छोटा कांदा (चिरून)
१ छोटासा टोमॅटो (चिरून)
१ टी स्पून गरम मसाला
१/२ टी स्पून धने-जिरे पावडर
२ लाल सुक्या मिरच्या
१ हिरवी मिरची (चिरून)
मीठ चवीने
२ टे स्पून कोथिंबीर (चिरून)
कृती: प्रथम मसूर डाळ धुवून घ्या, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिरून घ्या. लसूण सोलून ठेचून घ्या.
कुकरमद्धे मसूर डाळ व त्यामध्ये थोडीशी हळद, एक चमचा तूप व थोडेसे मीठ घालून २ शिट्या काढून घ्या. मग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग, लाल सुकी मिरची, कांदा घालून थोडा परतून घ्या, मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या.
आता टोमॅटो परतून झाल्यावर थोडेशी हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ व मसूर डाळ घालून मिक्स करून घ्या,
आता हवे तसे पाणी घालून मिक्स करून चांगली उकळी येवू द्या. मसुर डाळ तडका ला उकळी आली की कोथिंबीर घालून मिक्स करा.
गरम गरम डाळ तडका जिरा राईस बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.