समाजात आपल स्वतःच व्यक्तिमत्व किंमत वाढवायची असेलतर हे करा
Tips To Increase Your Status In Society In Marathi
आपण समाजात वावरत असतो म्हणजेच आपल्या सोसायटीमध्ये किंवा नोकरी कामधंद्याच्या ठिकाणी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा काही इतर कामासाठी तर अश्या वेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या त्यामुळे लोकांचा आपल्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल व आपले महत्व आपोआप वाढून लोक आपल्याला स्वतःहून मान द्यायला लागतील.
The Tips To Increase Your Status In Society In Marathi can be seen on our You tube Chanel Tips To Increase Your Status In Society
१. सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा जे काय काम करीत असू तिथे कोणत्या सुद्धा व्यक्तिच्या पुढे पुढे करू नये त्यामुळे आपली किमत कमी होते लोक आपल्याला गृहीत धरतात त्यांना वाटते की ह्या व्यक्तिला आपली गरज आहे त्यामुळे आपल्या पुढे पुढे करीत आहेत. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा.
२. आता दुसरे म्हणजे जशास तसे आपण वागले पाहिजे म्हणजे काय तर दूसरा व्यक्ति आपल्याला काही किमत देत नाही टोमणे मारीत आहे किंवा आपल्याला कमी लेखत आहे किंवा आपल्याला नावे ठेवत आहे तर आपण सुद्धा तसेच त्या व्यक्तिशी वागावे. आपण नेहमी चांगले वागत राहिलो तर लोक आपल्याला ग्रँटेड धरतात त्यामुळे आपण जशास तसे वागावे. म्हणजे आपला मान नेहमी चांगला राहतो.
३. आपल्याला जर कोणी काही सल्ला विचारला तरच द्यावा, उगीच फुकटचा सल्ला कोणाला द्यायला जाऊ नका. नाहीतर लोक म्हणतात आला फुकटचा सल्ला द्यायला.
४. आपल्याला जर कुठे समारंभाला बोलावले नाहीतर त्या बदल कोणाकडे सुद्धा बोलू नका, कारणकी ज्या व्यक्तिने आपल्याला समारंभाला बोलावले नाही त्याला समजेल व त्याची खात्री होईल की तुम्हाला बोलावले नाही त्यामुळे तुम्ही रागावला आहात म्हणून त्याची कोणाला सुद्धा ह्या गोष्टीची वाचता करू नका. पुढे कधी तुमच्या कडे काही समारंभ झाला तर तुम्ही सुद्धा त्याना बोलवू नका.
५. प्रतेक घरात नवरा-बायकोची भांडणे होत असतात किंवा फॅमिली मध्ये सुद्धा भांडणे होत असतात. तर घरातील भांडणाची गोष्ट कोणाला सुद्धा सांगू नये कारणकी लोक त्याची मज्जा घेतात त्यांना आपल्या गोष्टीमध्ये जरा सुद्धा रुचि नसते ते नुसता टाइमपास साठी आपले बोलणे आइकून मज्जा घेतात.
६. आपल्याला कोणी जर मदत मागितली तरच मदत करावी. स्वतः मदत करायला जाऊ नये त्यामुळे आपली किमत कमी होते. तसेच आपण सुद्धा कोणाची मदत घेऊ नये स्वतःचे काम स्वतः करायला शिकावे नाहीतर लोकांना वाटते की ह्यांना साधे सोपे काम येत नाही. तसेच लोक सुद्धा कामा पुरता मामा असत्तात ही लक्षात ठेवावे.
७. तसेच जास्त बडबड करू नये त्यामुळे सुद्धा आपले व्यक्तिमत्व कमी होते, लोकांचा आपल्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
८. आपण नेहमी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने वागावे. प्रतेक गोष्टीत आत्मविश्वासाने भाग घेऊन काम पूर्ण करावे. तसेच गबाळया सारखे राहू नये, नीटनेटके रहावे त्यामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते. नवीन नवीन गोष्टी आपण शिकायला पाहिजे. व आपले व्यक्तिमत्व कसे वाढावे ते पहावे. आपल्याला एखादी गोष्ट जमली नाहीतर एकदा कोणाला तरी विचारा पण सारखे सारखे विचारू नका त्याने आपले महत्व कमी होते स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायला शिका .
९. आपण लोकांना ओळखायला शिकावे, कोणत्या लोकांना किती महत्व द्यायचे ते आपणच अनुभवांनी शिकले पाहिजे. कामा शिवाय जास्त वेळ बोलत बसू नये बोलताना मुद्दे सुद बोलावे. त्यामुळे समोरील व्यक्ति आपले म्हणणे नीटपणे आइकून घेईल.
१०. जर कोणत्या व्यक्तिने आपला आपमान केला तर वेळ आली की त्या व्यक्तिला आपण बरोबर सुनावले पाहिजे पण भांडून त्याचा बदला न घेता आपली जास्त प्रगती करून त्याला बोलून त्याचा बदला घ्या. आपल्याला नहमी आनंदी राहायचे असेलतर कोणाच्या भानगडीत पडू नका.
११. आपले मित्र परिवार किंवा नातेवाईक किंवा शेजार पाजारी सारखे सारखे जाऊ नका त्यामुळे आपली किमत कमी होते. सारखे सारखे गेले तर ते आपल्याला किमत देणार नाहीत.