12 का 13 नोव्हेंबर देवउठनी एकादशी तुलसी विवाह 2024 घरी अगदी सोप्या पद्धतीने तुलसी विवाह करून पुण्य मिळवा
Tulsi Vivah 2024 Vidhi Full Information In Marathi
तुलसी विवाह देवउठनी एकादशी पासून सुरू होतो. ह्या वर्षी 12 नोव्हेंबर 2024 मंगळवार ह्या दिवशी कार्तिक देवउठनी एकादशी आहे ह्या दिवसा पासून तुलसी विवाह सुरू होतो. असे म्हणतात की घरात तुलसी विवाह केल्याने आपल्याला पुण्य मिळते. त्याच बरोबर जीवनात सुख मिळून कष्ट दूर होतात. जर आपण घरी तुलसी विवाह करणार असाल तर अगदी सोप्या पद्धतीने तुलसी विवाह करून पुण्य मिळवा त्याची संपूर्ण माहिती म्हणजेच पूजेचे साहित्य व विधी पूर्वक तुलसी विवाह कसा करायचा.
तुलसी विवाहचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीला देवउठनी एकादशी येते. ह्या दिवशी तुलसी विवाह केला जातो. ह्या वर्षी 12 नोव्हेंबर 2024 मंगळवार ह्या दिवशी तुलसी विवाह करायचा आहे. तुलसी विवाह एकादशी व द्वादशी ह्या दिवशी सुद्धा करतात.
तुलसी विवाह शुभ मुहूर्त:
धार्मिक मान्यता अनुसार तुलसी विवाहचे नियोजन द्वादशी तिथीला व्हायला पाहिजे ह्या वर्षी 12 नोव्हेंबर संध्याकाळी द्वादशी तिथी सुरू होत आहे. म्हणून आपण 12 नोव्हेंबर किंवा 13 नोव्हेंबर ह्या दिवशी तुलसी विवाह करू शकता.
12 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी 4 वाजून 06 मिनिट ला द्वादशी तिथी सुरू होत असून संध्याकाळी तुलसी विवाह करू शकता. पण 13 नोव्हेंबर 2024 बुधवार ह्या दिवशी तिथी दुपारी 1 वाजून 02 मिनिट पर्यंत आहे. जे कोणी 13 नोव्हेंबरला तुलसी विवाह करणार असतील तर दुपारच्या आत केला पाहिजे/
तुलसी विवाह पूजा साहित्य:
तुळशीचे रोप, शालिग्राम, कलश, नारळ (पाणी असलेला)
पूजेसाठी चौरंग, लाल रंगाचे कापड, हळकुंड
16 श्रृंगार साहित्य (बांगड्या, जोडवी, पैजन, सिंदूर, मेंदी, कागद, गजरा, हार इ.)
फळ व भाज्या (आवळा, बीटरूट, सिंगाडा, सीताफळ, डाळिंब, मुळा, पेरू इ. )
पूजा साहित्य हळद, कुंकू, अक्षता, कापुर, तेलाची समई, तुपाचा दिवा, चंदन, ऊस, ओटीचे सामान
तुलसी विवाहची संपूर्ण विधी:
देवउठनीच्या दिवशी जे लोक तुलसी विवाह करतात त्यांना कन्यादान करावे लागते त्यासाठी संपूर्ण दिवस उपवास करावा लागतो.
मग शालिग्राम च्या बाजूनी पुरुष व तुलसी माताच्या बाजूनी महिला गोळा कराव्या लागतात.
संध्याकाळी दोन्ही बाजूची मंडळी विवाहासाठी एकत्र येतात.
तुलसी विवाहच्या दिवशी संध्याकाळी घराच्या समोर सडा रंगोली काढून चौरंग ठेवतात. चौरंगाला सजवतात. बाजूनी रंगोली काढली जाते.
मधोमध रंगोली काढून त्यावर चौरंग ठेवतात व बाजूला तुलसी माताच्या रोपाला सजवून ठेवतात. तुलसी माताच्या रोपांच्या कुंडीला छान रंगवतात, लाल रंगाची ओढणी घालतात, लाल रंगाची साडी नेसवतात, बांगड्या घालतात व तिला श्रृंगार करतात.
तुळशी विवाह जेथे करणार त्या ठिकाणी तुळशीच्या रोपावर ऊसाचा मंडप बांधतात.
मग चौरंगवर अष्टदल कमल बनवून शालिग्रामना स्थापित करून त्यांना सजवतात.
मग कलशची स्थापना करतात, सर्वात पहिल्यांदा कलश मध्ये पानी भरून त्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करा, मग आंब्याची 5 पाने ठेवा मह त्यावर लाल रंगाच्या कापडात नारळ गुंडाळून कलशावर ठेवा.
चौरंगावर शालिग्राम ठेवल्यावर तुळशीला उजव्या हाताच्या बाजूला ठेवा.
मग दिवा लावावा व ॐ श्री तुलस्यै नम: ह्या मंत्राचा जाप करावा. शालिग्राम व माता तुलसीवर गंगाजल शिंपडावे.
मग शालिग्रामना दूध व चंदन मिक्स करून त्याचा तिलक लावावा. व माता तुळशील रोलीचा तिलक लावावा.
मग शालिग्राम व माता तुलसीला हळद-कुंकू, अक्षता, फूल, अर्पित करावी.
मग पुरुषांनी शालिग्रामना उचलून धरावे व महिलांनी माता तुळशीला उचलावे, मग तुळशीला 7 प्रदक्षिणा माराव्या तेव्हा बाकीच्या लोकांनी मंगलाष्टक म्हणून मंत्र ऊचार करावा. मंत्र म्हणतात कोणी चुकू नये.
मग शेवटी खीर-पुरीचा भोग दाखवावा. शेवटी माता तुळशी व भगवान शालिग्रामची आरती करावी. मग शेवटी प्रसाद वाटावा.