Zatpat 5 Minitat Poushtik Salichya Lahya Chi Barfi Bina Gas Bina Mawa In Marathi
लक्ष्मीपूजनाच्या लाह्या राहिल्या 5 मिनिटात बिना गॅस बिना मावा साळीच्या लाहयाची बर्फी
आपण लक्ष्मी पूजनच्या दिवशी साळीच्या लाहया आणतो. कारण की वर्षभरात आपण फक्त दिवाळी मध्ये आणतो. पान ह्या साळीच्या लाहया खूप पौष्टिक आहेत. साळीच्या लाहयाचे सेवनाचे खूप फायदे आहेत. लक्ष्मी पुजन झाल्यावर साळीच्या लाहया काय करायचे हा प्रश्न असतो. त्यासाठी एक छान सोपा उपाय आहे त्याची बर्फी बनवण्याचा.
The Zatpat 5 Minitat Poushtik Salichya Lahya Chi Barfi Bina Gas Bina Mawa In Marathi can be seen on our You tube Chanel Poushtik Salichya Lahya Chi Barfi Bina Gas Bina Mawa
साळीच्या लाहयाची बर्फी बनवताना आपल्याला विस्तवाची म्हणजेच गॅस ची जरूरत नाही तसेच मावा किंवा खवाची सुद्धा गरज नाही. अगदी सोपी झटपट होणारी बर्फी आहे तसेच पौष्टिक सुद्धा आहे.
साळीच्या लाहयाचे सेवणाचे फायदे पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता: साळीच्या लाहयाचे सेवनाचे फायदे
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप साळीच्या लाहया
1/2 कप साखर (थोडी कमी घेतली तरी चालेल)
1/4 कप मिल्क पावडर
1/4 कप डेसिकेटेड कोकनट
1/2 कप मलई (फ्रेश)
3 हिरवे वेलदोडे
7-8 काजू
5-6 पिस्ते
कृती: प्रथम साळीच्या लाहया निवडून चाळून घ्या, म्हणजे त्याची काही टरकल असतील किंवा काही कचरा असेल तर निघून जाईन. पिस्ताचे तुकडे कापून घ्या.
मग मिक्सरच्या जार मध्ये साखर व वेलची घालून वाटून बाजूला ठेवा. एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये फ्रेश क्रीम घेऊन थोडे फेटून घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या.
आता मिक्सरच्या जारमध्ये साळीच्या लाहया व काजू घेऊन बारीक वाटून घेऊन पिठीसाखरेच्या मिश्रणात घालून त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट व मिल्क पावडर घालून मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्या.
एका ट्रेमध्ये पिस्ताचे काप घालून एक सारखे पसरवून घ्या. मग त्यावर बनवलेले मिश्रण एक सारखे पसरवून घ्या. मग ट्रे फ्रीजमध्ये 5-10 मिनिट सेट करायला ठेवा. बर्फी सेट झाल्यावर त्याचे एकसारखे तुकडे कापून सर्व्ह करा.