1st January 2025 Kara 5 Upay Hoil Mata Lakshmi Chi Krupa In Marathi
1 जानेवारीला 5 उपाय करा होईल माता लक्ष्मीची कृपा
1 जानेवारी 2025 बुधवार ह्या दिवशी करा ही 5 सोपी कामे माता लक्ष्मीची कृपा होऊन धन-दौलतची होईल प्राप्ती
हिंदू धर्मामध्ये प्रतेक नवीन काम करताना किंवा कामाची सुरवात करताना खास वेळ पहिली जाते. तसेच प्रतेक व्यक्तीला वाटते की येणारे नवीन वर्ष खूप आनंदात जाऊन भाग्याची साथ लाभू दे. प्रतेक नवीन येणारे वर्ष नवीन उमीद व खुपसारा आनंद घेऊन येते. जर आपल्याला वाटत असेलकी येणारे नवीन वर्ष आपल्याला मंगलमय जावो व आपल्या जीवनात सुख-समृद्धी येऊन लक्ष्मी माताची कृपा राहावी तर पुढे दिलेले काही ज्योतिषी उपाय करून पहा त्याने आपले नवीन वर्ष सुखकारक जाईल.
The 1st January 2025 Kara 5 Upay Hoil Mata Lakshmi Chi Krupa In Marathi can be seen on our You tube Chanel 1st January 2025 Kara 5 Upay Hoil Mata Lakshmi Chi Krupa
ब्रह्म मुहूर्तवर उठावे:
सनातन धर्मामध्ये ब्रह्म मुहूर्तच्या वेळी उठणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार ब्रह्म मुहूर्तवर केले जाणारे काम बऱ्याच कार्यामध्ये सफलता देते. म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर उठावे व ह्या वेळात ध्यान, योग व प्रार्थना करावी. असे केल्याने दिवसभर आपले मन शांत व सकारात्मक ऊर्जा नी भरून जाईल.
सकाळी उठल्या बरोबर आपल्या तळहातांचे दर्शन घ्या:
ज्योतिष शास्त्रा नुसार सकाळी उठल्या बरोबर आपल्या तळ हाताचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की आपल्या तळ हातांमध्ये माता लक्ष्मी, सरस्वती व भगवान विष्णु ह्याचा वास असतो. म्हणूनच सकाळी उठल्या बरोबर आपल्या तळ हातांचे दर्शन घेऊन मंत्र जाप करावा.
मंत्र:
“कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती |
करमुले स्थितो ब्रह्मा, प्रभाते कर दर्शनम || “
दान करावे व जरूरत मंदना मदत करावी:
नवीन वर्षाची सुरवात करताना कोणत्या सुद्धा जरूरत मंदला मदत करावी. म्हणजेच जरूरत मंदला जेवण, कपडे किंवा काही जरुरीचे सामान दान करावे. त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळेल व दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्या वरील आनंद पाहायला मिळेल. नवीन वर्षाची सुरवात करताना हा एक चांगला उपाय आहे.
देवाची मनोभावे पूजा अर्चा करा:
नवीन वर्षाची सुरवात करताना देवाची मनोभावे पूजा अर्चा करावी. घरातील देव्हाऱ्यात दिवा लाऊन नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो व प्रतेक कामात यश मिळो अशी प्रार्थना करावी. त्याच बरोबर घराची साफ-सफाई करून सजवावे व घरात आनंदी वातावरण ठेवावे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरवात चांगली होईल.
नवीन संकल्प करा:
नवीन वर्षाची सुरवात नवीन संकल्प घेऊन करा. आपले जीवन चांगले जावे म्हणून चांगला संकल्प करा. जसे की रोज व्यायाम करा, वेळच्या वेळी काम करा तसेच वाईट सवयी सोडा, सकारात्मक रहा असे छोटे-छोटे बदलाव केल्याने आपले नवीन वर्ष चांगले जाईल.
झाडू कोणाला दान किंवा वापरायला देवू नका:
आपल्या घरातील झाडू कोणाला सुद्धा वापरायला किंवा दान करू नका. झाडू म्हणजे लक्ष्मी माताचे रूप आहे. झाडू कोणाला दान केल्यास दरिद्र येते. लक्ष्मी माता आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाते. आपल्या प्रतेक कामात अडचणी येतात. तसेच दान केलेली वस्तु परत घेता येत नाही.